मुंबई : भारत-चीन लडाख वादाचा पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहेत. याचा जोरदार फटका चीनलाच बसणार आहे. चीनकडून लडाख सीमा वाद उकरुन काढण्यात आला. चर्चा सुरु असताना चीन सैन्याकडून हिंसक झडप झाली. यात भारताचे २० जवान शहीद झालेत. तर चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनवरील बहिष्कार तीव्र होत आहे. चीन जगात एकटा पडत चालल्याचे चित्र निर्माण होत आहे. ऑस्ट्रेलिया भारताच्या बाजूने बाहेर आला आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओफरेल यांनी बुधवारी सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसर्‍या महायुद्धानंतर स्थापन करण्यात आलेल्या नियम व कायद्यांचे पालन करीत आहेत, परंतु चीन तसे करत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी यावर जोर दिला की चीन दक्षिण चीन सागरात एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. हे या विषयावर झालेल्या सहमती आणि वाटाघाटीनुसार नाही. विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाउंडेशन येथे आपल्या भाषणात ते म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक समान चिंता आहे. ऑस्ट्रेलियाने भारताची बाजू घेतल्याने आता चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे तोंड द्यावे लागणार आहे. आधीच अमेरिका चीन विरोधात गेली आहे. अमेरिकेने थेट चीनला इशारा दिला आहे. त्यामुळे चीनची आता हळूहळू कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.


ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओफरेल म्हणाले की, चीनने चांगला विकास केला आहे पण सामर्थ्याने जबाबदारी येते. द्वितीय विश्वयुद्धानंतरच्या काळात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी बनविलेले नियम आणि व्यवस्था यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने आमच्याकडे काळजी करण्याची कारण आहे की, आम्ही या स्वरुपाचे पालन करीत आहोत. मात्र, त्याप्रमाणे बीजिंग त्याबद्दल समर्पित  नसल्याचे दिसून येत आहे.