युद्धासाठी सज्ज व्हा! चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्याला इशारा
हे युद्ध असेल....
बिजिंग : मंगळवारी china चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील लष्कराला उद्देशून अत्यंत महत्त्वाचा इशारावजा संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्यानं साऱ्या विश्वाचं लक्ष वेधलं गेलं. चीनमधील सद्यपरिस्थिती पाहता त्यांनी लष्कराचा आत्मविश्वास वाढवत केलेल्या संबोधनपर भाषणात युद्धासाठी सज्ज होण्याची हाक दिली आहे.
चीनच्या राष्ट्राध्यक्षांची ही हाक भारतासाठी तणावाची परिस्थिती निर्माण करु शकेल का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तसं नाहीये. कारण, जिनपिंग यांनी या इशारा कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर दिल्याचं सांगण्यात येत आहे.
Covid 19 कोविड 19 अर्थात Coronavirus कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीचा देशाच्या संरक्षण यंत्रणेवर होणारा दूरगामी परिणाम पाहता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कराने युद्धासाठी सज्ज व्हावं असा इशारा त्यांनी दिला. हे युद्ध असेल कोरोना व्हायरससोबतचं. असं असलं तरीही अमेरिका आणि भारतासह चीनचं सध्याचं नातं पाहता कोरोनाच्या नावाआड चीनमध्ये नेमकी कोणत्या युद्धाची तयारी होते, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
चीनच्या अध्यक्षांच्या पत्नीचं WHO सोबत काय आहे कनेक्शन?
स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार जिनपिंग म्हणाले, 'सैन्याचं बळ सर्वतोपरी वाढवून त्यांनी युद्धासाठी सज्ज व्हावं. एक संकल्प करुन राष्ट्राचं सार्वभौमत्वं जपावं आणि रचनात्मक आखणीने देशाच्या स्थैर्याचंही रक्षण करावं'.
अमेरिकेसोबतच्या बिथरलेल्या राजकीय नात्याबाबतचा तिढा सुटत नसतानाच जिनपिंग यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला कोरोना आणि तणावाच्या परिस्थितीमुळं उभी राहिलेली आव्हानं पाहता हा काळ राष्ट्रीय सुरक्षिततेची परीक्षा पाहणारा आहे, असंही जिनपिंग म्हणाले. मुख्य म्हणजे चीनमधील माध्यमांमध्ये जिनपिंग यांच्या या संबोधनपर भाषणादरम्यानचे काही फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. ज्यामध्ये विमानवाहू युद्धनौकाही पाहायला मिळाल्याचं सांगण्यात आलं.
चीनकडून लष्कराची प्रगती ही आर्थिक प्रगतीच्या बरोबरीनेच असावी यासाठीच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात चीनच्या हालचालींवर सर्वांचं लक्ष असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.