एकाच तरुणाने आई आणि मुलाला गंडा घातल्याचा प्रकार चीनमध्ये (china) समोर आला आहे. हा तरुण एकाच वेळी दोघांना डेट करत होता. या तरुणाने दोघांचीही साडेसोळा लाखांची फसवणूक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फसवणुक करणाऱ्याचे फक्त सॉन्ग हे आडनावच समोर आलं आहे. तब्बल पाच वर्षे या तरुणाने आई आणि मुलाला मूर्ख बनवले. चीनच्या प्रसिद्ध WeChat अॅपवर सॉन्गने'जियांग'या महिलेसोबत चॅटिंग करत होता. 


तर दुसरीकडे सॉन्ग जियांगचा मुलगा लीसोबतही चॅटिंग करत होता.सॉन्ग चीनच्या गान्सू प्रांताचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.


सॉन्गची 2018 साली जियांगशी भेट झाली. मग सॉन्गने जियांगला विचारले की ती अविवाहित आहे का? यानंतर दोघांनी एकमेकांना नंबर शेअर केले. काही दिवसांतच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.


वर्षाच्या अखेरीस,सॉन्गने जियांगच्या मुलाला म्हणजे लीला डेट करण्यास सुरुवात केली. सॉन्गने लीला  एक महिला म्हणून ओळख पटवून दिली. सॉन्ग लीसोबत फक्त ऑनलाइनच बोलत असे. 


यादरम्यान, सॉन्गने जियांगकडे प्रेमाचा खुलासा केला. यातच त्याने जियांगकडे सव्वा आठ लाख रुपयेही मागितले. कर्मचाऱ्यांना देण्यासाठी हे पैसे घेत असल्याचे सॉन्गने म्हटले.
 
त्यानंतर सॉन्गने जियांगच्या मुलाचीही फसवणूक केली. गर्लफ्रेंन्ड बनून चॅटिंग करणाऱ्या सॉन्गने लीकडूनही सात लाख रुपये घेतले.


सॉन्ग जवळपास पास वर्षे आई आणि मुलाची फसवणूक करत राहिला. त्यानंतर दोघांनाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दोघांनीही पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.


मिररच्या वृत्तानुसार, चीनमध्ये याआधीही WeChat वरुन फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. चीनमध्ये आर्थिक फसवणूक करण्यासाठी WeChatचा अनेकदा वापर केल्याचे पाहायला मिळाले आहेत