बीजिंग : चीन कोरोना विषाणूचा वापर जैविक युद्धासाठी करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यावर चीनने प्रत्युत्तर देत. हा दावा खोडून काढला आहे. अशाप्रकारचे आरोप खोटे असून चीनची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे चीनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मीडिया रिपोर्टनुसार चीन कोरोना विषाणूवर 2015 पासून संशोधन करीत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री हुआ चनयिंगने ऑस्ट्रेलियाच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे. मी तो रिपोर्ट पाहिला आहे. काही लोक चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथ्यांना चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहे. चीन आपल्या प्रयोगशाळांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेता. असे दावे फक्त चीनची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचं चनयिंग यांनी म्हटलं आहे.


ऑस्ट्रेलियाच्या मीडिया रिपोर्टमध्ये स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. की चीन 2015 पासून कोरोना विषाणूवर संशोधन करीत होता.  अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाला चीनच्या सैन्य वैज्ञानिक आणि चिकित्सा अधिकाऱ्यांनी लिहलेले कागदपत्र मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यात विषाणूला जैविक युद्धासाठी वापरण्यात येणार आहे.