China vs Taiwan War News : दक्षिण चीन (China) समुद्रात परिस्थिती गंभीर बनलीय. कारण चीन सातत्यानं तैवानवर (Taiwan) हल्ल्याची धमकी देतोय. चीनचं सैन्य तैवानला चिथावणी देतोय. अशातच चीनच्या 42 लढावू विमानांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा तैवाननं केलाय. चीनच्या संतापाचं कारण आहे तैवानचे उपराष्ट्रपती विल्यम लाई यांचा अमेरिका (America) दौरा. विल्यम लाई पुढच्या वर्षी तैवानमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत प्रबळ दावेदार असणार आहेत. आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी चीनची चांगलीच कानउघाडणी केलीय. विल्यम लाई यांच्या भाषणानं चीनचा तीळपापड झालाय. आता याचे परिणाम तैवानला भोगावेच लागतील अशी धमकी चीननं दिलीय. याच रागातून चीननं सीमा भागात जोरदार युद्धसराव सुरू केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे चीन तैवानला धमकावत असला तरी दुसरीकडे तैवाननं देखील चीनला जशास तसं उत्तर देण्याची तयारी केलीय. चीनकडे एक असं हत्यार आहे, ज्यामुळे तैवान चीनला चारीमुंड्या चीत करू शकतं. तैवानकडे पोर्टेबल ड्रोन अल्बाट्रॉस नावाचं शस्त्र आहे. संपूर्ण तैवान बनावटीचं हे शस्त्र तैवानचं ब्राह्मास्त्र असल्याचं बोललं जातंय. 


युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकन बनावटीचं असंच एक पोर्टेबल ड्रोन वापरण्यात आलं होतं. तैवानच्या या ड्रोनचं वैशिष्ट्य म्हणजे चीन-तैवानच्या खाडीत ते एखाद्या क्षेपाणास्त्रासारखं काम करेल. चीन आणि तैवान यांच्यातील खाडी खूपच अरूंद आहे. ज्यावेळी चिनी जहाजं खाडीतून तैवानच्या दिशेनं कूच करतील त्याचवेळी हे ड्रोन चिनी जहाजांना सहजपणे लक्ष करेल. तैवाननं आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार या ड्रोनची निर्मिती केलीय. इतकच नाहीतर हे ड्रोन चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. त्यामुळे युद्ध झालच तर चीनसाठी हे युद्ध निश्चितच सोप्प नसेल..


चीन आणि तैवानमध्ये ऑगस्ट 2022 पासून तणाव वाढला आहे. 'द फर्स्‍ट बैटल ऑफ द नेक्‍स्‍ट वॉर' ने दिलेल्या अहवालानुसार चीन आणि तैवानचं युद्ध झाल्यास हजारो मृत्यू होतील. चीन आणि तैवानचे हजारो सैनिक या युद्धात मारले जातील. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार युद्धात सर्वाधिक नुकसान हे चीनचं होऊ शकतं. चीनचे जवळपास दहा हजार सैनिक बंदी होतील तर जवळपास तितक्याच सैनिकांचा मृत्यू होईल. याशिवाय चीनेच 155 एअर क्राफ्ट आणि 138 जहाजं पूर्णपणे नष्ट होतील. 


चीन-तैवान वाद काय आहे?
तैनाव हा आपल्याच देशाचा भाग असल्याचं चीनचं म्हणणं आहे. तर आपण स्वंतत्र्य देश असल्याचं तैवानचं म्हणणं आहे. आपला भाग मिळवण्यासाठी चीनचे सेना सज्ज असल्याचं चीनच्या सरकारने म्हटलंय. तर या लढाईत बाहेरच्यांनी हस्तक्षेप केल्यास त्यांनाही याचे परिणाम भोगवे लागतील असा इशारीह चीनने दिलाय.