बीजिंग : चीनचा नवा तळ ग्वादारजवळ असण्याची शक्यता


ग्वादारजवळ नवा तळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेत सोमालियाच्या जवळ जीबाऊती या देशात चीनने एक नाविक तळ उभारलेला आहे. त्यानंतर आता आपला दुसरा परदेशातील नाविक तळ उभारण्याच्या प्रयत्नात चीन आहे. पाकिस्तानात याआधीचं चीन ग्वादार हे व्यापारी बंदर बांधलेलं आहे. आता त्याच्याजवळ चीन एक नाविक तळ तयार करतोय.


चीनची लष्करी गरज


चीनला ग्वादार हे व्यापारी बंदर बांधल्यानंतर आपल्या युद्दनौका तैनात करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या देखभालीसाठी एका नाविक तळाची गरज आहे. त्यामुळेच ग्वादारजवळ आता एक चीनी नाविक तळ उभारला जाईल, असं साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.


चीनचे डावपेच


व्यापारी जहाजांना लागणारी यंत्रणा आणि सोयीसुविधा या युद्दनौकांना लागणाऱ्या यंत्रणेपेक्षा वेगळ्या असतात. ग्वादार हे एक व्यापारी बंदर आहे. त्यामुळे ग्वादारमध्ये चीनी युद्दनौका तैनात केल्या जाऊ शकत नाहीत. यासाठीच चीन नवा नाविक तळ बांधतो आहे. आखातात स्वत:चा प्रभाव वाढवण्याचेसुद्धा चीनचे डावपेच आहेत.