चीन : कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक राष्ट्रांमधील शहरामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. पण आता कोरोना विषाणाचा फैलाव नियंत्रणात आल्यामुळे चीनच्या हुबेई प्रांतातून लॉकडाउनचा निर्णय मागे घेण्यात येणार आहे. अधिक महत्त्वाचं म्हणजे ज्या शहरातून कोरोनाचा उदय झाला त्याठिकाणी घोषित केलेला लॉकडाउनचा निर्णय मागे घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा प्रथम प्रसार झाला होता. आताच्या घडीला चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण अढळलेला नाही. चीनबरोबरच संपूर्ण जगासाठी ही बातमी आनंदाची आसणार आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झली असली तरी दुसऱ्या देशांमध्ये या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 


संपूर्ण जगात ३ लाख ८० हजार पेक्षा जास्त लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. तर १६ हजार ४९७ रुग्णांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५१३ वर पोहोचली आहे. तर ३४ रुग्णांची या आजारातून सुखरूप सुटका झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.