धरमशाला : आधुनिक जगाला प्राचीन भारतीय शिकवण आणि दृष्टिकोनाची गरज आहे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलंय.


भविष्याचा घेतला वेध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनाच्या विविध अंगांवर तसच सध्याच्या जागतिक परिस्थितीवर तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी वस्तुनिष्ठ चिंतन केलंय. त्यात त्यांनी भूतकाळातल्या घडामोडींचा संदर्भ घेत वर्तमान आणि भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय.


सर्वत्र प्रचंड हिंसाचार


सध्या जगात सर्वत्र प्रचंड हिंसाचार सुरू असून प्रेम, शांतता आणि सुसंवादाचा अभाव आहे. सर्वच प्रश्न ताकदीच्या बळावर सोडवण्याची मानसिकता वाढत चाललीय. याचा सर्व जगाने नव्याने विचार करण्याची गरज आहे. 


जन्माला आल्यापासून बघतोय फक्त हिंसा


मी जन्माला आल्यापासून चीन-जपान युद्ध, दुसरं महायुद्ध, कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध अशी अनेक युद्धं झाली आहेत. युद्ध म्हणजे संघटितपणे मोठ्या प्रमाणावर केलेली नियोजनबद्ध हिंसा. हे सर्व कुठेही थांबतांना दिसत नाही. पण आता आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहीजे, असं विश्लेषण दलाई लामांनी व्यक्त केलंय.


चीनसुद्धा भारताचं अनुकरण करेल


भारताची प्राचीन शिकवण आणि तत्वज्ञान हे पुस्तकी नसून वस्तुनिष्ठ आहे. अहिंसा हे महत्वाचं मूल्य भारताने हजारो वर्षांपासून सांभाळून ठेवलं आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा जन्म भारतातच झाला असून तिबेट आणि चीनमध्ये याच तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. त्यामुळेच जर भारताने पुढाकार घेतला आणि आपला जीवनविषयीचं प्राचीन ज्ञान जर जगापुढे परत एकदा नव्याने मांडलं तर चीनसुद्धा भारताचं अनुकरण करेल. 


जगतगुरूच्या भूमिकेत भारत


भारताने आता जगतगुरूच्या भूमिकेत शिरत जगाला मार्ग दाखवला पाहीजे. मला 100 % खात्री आहे की भारतीय परंपरा जगाला अधिक चांगलं बनवू शकते, असंही विवेचन दलाई लामांनी केलंय.