बिजिंग : सोमवारी रात्रीच्या सुमारास भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये galwan valley  येथे झालेल्या चकमकीनं सीमा वादामुळं निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीत आणखी भर टाकली. भारतीय सैन्यातील दोन जवान आणि एका अधिकाऱ्यांना या आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर दोन्ही देशांकडून सुरु असणाऱ्या राजकीय हालचालीही वाढल्याचं पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त भारताच्याच नव्हे, चीनच्या सैनिकांनाही या चकमकीत प्राण गमवावे लागल्याचा सूर शेजारी राष्ट्रानं आळवला. या चर्चा शमण्याचं नाव घेत नाहीत तोच चीनकडून आणखी एक कांगावा करण्यात आला. 


चीनमधील ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात एलएसी ओलांडली असून, यावेळी त्यांनी चीनी सैन्याला उद्युक्त करण्यासाठी म्हणून जाणिवपूर्वक हल्ला केला. चीनच्या कांगाव्यानुसार हे सारं विकोपाला गेलं, ज्यामध्ये काही सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. चीननं पुन्हा एकदा केलेला हा कांगावा पाहता आता त्याची खातरजमा करत भारतीय लष्कराकडून यावर काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. 



आम्हाला वाद नकोय, पण वेळ पडली तर घाबरणारही नाही; चीनची दर्पोक्ती 


 


दरम्यान, भारतानं गलवान खोऱ्यातील चकमकीप्रकरणी एकतर्फी कारवाई करु नये असं काही क्षणांपूर्वीच चीनतर्फे सांगण्यात आलं होतं. सदर संवेदनशील प्रकरणी चीनला वाद नको असला तरीही वेळ आल्यास आपण घाबरणार नसल्याची भाषाही त्यांच्याकडून वापरण्यात आली होती. त्यामुळं हे प्रकरण आता एका गंभीर वळणावर आलं असून, दोन्ही राष्ट्रांच्या भूमिका यात महत्त्वाच्या ठरणार आहेत.