नवी दिल्ली : चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय. तूर्तास हे अंतराळ स्थानक समुद्रात पडेल, असं सांगण्यात येतंय. मात्र ते जमिनीवर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात हे अंतराळ स्थानक कोसळेल, असा अंदाज आहे त्यात भारताचाही समावेश आहे. जगभरातील तमाम अवकाश संशोधन संस्था या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.


भारतात कोसळण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या दाव्यानुसार, येत्या 1 एप्रिलला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1 ते सायंकाळी 7 या वेळेत ते कधीही पृथ्वीवर कोसळू शकते. ताशी 28 हजार किलोमीटर वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तियाँगगाँग 1चे अनेक तुकडे होतील. त्यातील बराचसा भाग वातावरणाशी घर्षण होऊन जळून खाक होण्याचीही शक्यता आहे. 1979 मध्ये स्कायलॅब हे अमेरिकन अंतराळ स्थानक अशाचप्रकारे पृथ्वीवर कोसळलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियात त्याचे छोटे तुकडे विखुरले होते. तियाँगगाँग 1 च्या निमित्तानं स्कायलॅबच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.


पाहा कशी घडणार घटना


टायोगोंग-1ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर जळण्यास सुरूवात होईल. सर्व प्रथम त्यावरील असलेले सौर पॅनेल जळुन जातील नंतर टायोगोंग-1चे मोठे दोन -तीन तुकड्यात रुपांतर होईल. हे तुकडे पुढे सरकत वातावरणात आणखी खाली घसरतील आणि त्याचे पुन्हा अनेक लहान लहान तुकड्यांमध्ये रुपांतर होऊन जळून जातील. पृथ्वीच्या पृष्ठभागावर टायोगोंग-1थेट कोसळण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र एखादा मोठा तुकडा येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. टायोगोंग-1 पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्या पासून संपुर्ण जळून खाक होईपर्यंत साधारण 2000 कि.मी. अंतर पार करेल. याचे तुकडे साधारण 70 कि.मी. रुंदीच्या पट्ट्यात विखुरण्याची शक्यता आहे.