China Covid : जगभरात कोरोना (Corona) लाट येऊन तीन वर्षे लोटली तरी अद्याप कोविड पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची सुरुवात झालेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच चीनने सक्तीच्या लॉकडाऊनची (china covid rules) घोषणा केलीय. मात्र चिनी जनताच आता या सक्तीच्या लॉकडाऊनच्या (Lockdown) विरोधात उतरली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कोविड धोरणाविरोधात देशभरात आंदोलने केली जात आहे. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठीही बळाचा वापर केला जात आहे. मात्र यानंतरही सरकारला आंदोलनावर नियंत्रण ठेवता आलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच चिनी सरकारने आंदोलकांवर दडपशाहीचा मार्ग अवलंबला आहे. तसेच कोरोना रुग्णांचे अतिशय क्रुरपणे विलगीकरण केले जात आहे. याचे अनेक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आल्यानंतर चीनने माफी मागितली. CNNने हा व्हिडीओ शेअर करत चीनने मागी मागतल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये पीपीई कीट घातलेल्या दोन व्यक्ती एका व्यक्तीला ओढून नेताना दिसत आहेत. चीनच्या दक्षिणेकडील हँगझोऊ शहरात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने विलगीकरणात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला खेचून नेले जात होते. मात्र आता चीनने या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.


पाहा व्हिडीओ -


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by CNN (@cnn)


दरम्यान, कोरोना नियमांमध्ये सूट दिल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने चीनचे कौतुक केले आहे. चीन कोरोना व्हायरसशी संबंधित काही निर्बंध शिथिल करत आहे. सरकार अडचणीत असतानाही ते त्यांच्या नागरिकांचे ऐकतय हे महत्त्वाचे आहे, असे जागतिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.