`ही` कंपनी १ लाख रुपयांत देतेय आयुष्यभर फ्री दारु
दारु पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, एका दारु बनविणाऱ्या कंपनीने एक जबरदस्त ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.
शांघाई : दारु पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, एका दारु बनविणाऱ्या कंपनीने एक जबरदस्त ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.
चीनमधील जिआंगजिआओबाई या दारू बनविणाऱ्या कंपनीने सिंगल्स असलेल्यांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफरनुसार कंपनी १,७०० डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ११ हजार १७१ रुपयांत कंपनीतर्फे तुम्हाला आयुष्यभर दारु देण्यात येणार आहे.
जिआंगजिआओबाई कंपनी शनिवारी एका शॉपिंग फेस्टिव्हल दरम्यान ही आपली ऑफर सादर करत आहे. हे शॉपिंग फेस्टिव्हल प्रत्येकवर्षी ११ नोव्हेंबर म्हणजेच ११/११ ला आयोजित करण्यात येतं. या फेस्टिव्हलची खास बाब म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वस्तूवर ११,१११ युआन (जवळपास १.०९ लाख रुपये) हे सिंबॉलिक प्राईस टॅग असतं.
ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाच्या Tmall प्लॅटफॉर्मवर ही ऑफर दिली जात आहे. ऑफरमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर ग्राहकाचा मृत्यू पाच वर्षांपूर्वी झाला तर परिवारातील इतर दुसऱ्या सदस्याला आयुष्यभर दारु पूरवली जाईल.
या ऑफरचा लाभ केवळ ९९ लकी कस्टमर्सला मिळणार आहे. लकी कस्टमर्सला प्रत्येक महिन्याला दारुचे १२ बॉक्स पाठवले जाणार आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये दारुच्या १२ बाटल्या असणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, अलीबाबाच्या डिस्काऊंट कुपन्सचा वापर करुन ग्राहक १ लाख ११ हजार १७१ रुपयांपेक्षा कमी रुपयांत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.