नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे जवळपास ४३ हजारहून अधिक लोक बाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ४० हजार बाधित एकट्या चीनमध्ये आहे. आता चीनमधून यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या लपविण्यासाठी चीन सरकार मोठ्या प्रमाणावर मृतदेह जाळून टाकत आहे. मृतदेह जाळल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. सॅटेलाईट इमेजमधून सल्फर गॅस बाहेर पडत असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. हा गॅस वुहानच्या आसपास अधिक दिसून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी 108 जणांचा मृत्यू


चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने म्हटलं की, कोरोना वायरसचे नवे 2,478 प्रकरण समोर आली आहेत. तर एका दिवसात 108 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,478 पैकी हुबेईमध्ये 2,097 रुग्ण आढळले आहे. चीन सरकारने वुहानमध्ये अनेक अधिकाऱ्यांना या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित केलं आहे. 


WHO ची टीम चीनमध्ये


WHO ची एक टीम चीनमध्ये दाखल झाली आहे. चीनसोबत ते कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. जिनेवामध्ये 400 वैज्ञानिकांसोबत बैठक पार पडत आहे. ज्यामध्ये या व्हायरसवर चर्चा होत आहे.