बिजिंग : भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि भारताला धमकी देणारे चीनी मीडिया आता अमेरिकेला देखील लक्ष्य करत आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर हल्ला केला आहे. ट्रंप यांच्या ट्विटवर चीनच्या वृत्तपत्राने म्हटलं आहे की, हा वाद ट्रंपच्या ट्विटने नाही सुधारणार. सोबतच वृत्तपत्राने म्हटलं आहे की, चीन त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला वगळून अमेरिकेची सुरक्षा नाही करणार. नॉर्थ कोरियाचा सनकी तानाशाह किम जोंगने मिसाईल परीक्षण केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलं होतं की, चीन हा मुद्दा सोडवू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे की, ट्विटवरुन राष्ट्राध्यक्ष ट्रंपचे विचार कळतात. उत्तर कोरियाने मागील काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, त्यांनी बॅलिस्टिक मिसाईल तयार केला आहे जो संपूर्ण यूएसपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे ट्रंप संतापले त्यांच्यासाठी नॉर्थ कोरियाचं मिसाईल परीक्षण रोखणं ही प्राथमिकता आहे. 


बिजिंगने नॉर्थ कोरियाच्या विरोधात यूएन सेक्युरिटी काउंसिल रिसॉल्यूशनला जबरदस्ती लागू केलं. चीनने नॉर्थ कोरियामध्ये कोल एक्स्पोर्टवर गरजेपेक्षा अधिक प्रतिबंध लावले आहेत. चीनच्या प्रतिबंधामुळे आधीच दोन्ही देशांमधील संबंधावर परिणाम झाला आहे.