Sex Scandal : विवाहबाह्य संबंधांची अनेक प्रकरणं तुम्ही आतापर्यंत ऐकली असतील. जगभरात विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक गुन्हेही घडल्याचे समोर आले आहे. आपल्या शेजारील चीनमध्ये (China News) अशाच एका प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. चीनमध्ये रोज घडणाऱ्या घटनांमुळे तिथल्या सरकारबाबत सातत्याने चर्चा होत असते. आपल्या हेरगिरीच्या (espionage) धोरणामुळे चीन सातत्याने चर्चेत असतो. मात्र अशाच एका हेरगिरीच्या प्रकरणामुळे चीनमध्ये सेक्स स्कँडल (Sex Scandal) उघडकीस आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन सरकारशी संबंधित एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्याच उपमहापौरांसोबत केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पूर्व चीनमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात एका उप महापौराचे दुसर्‍या विवाहित अधिकाऱ्यासोबतचे अफेअर 'सेक्स स्कँडल'च्या रूपात समोर आले. यानंतर या सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.


पतीचे उघड केला सर्व प्रकार


या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या सेक्स स्कॅंडलचा खुलासा तिच्या पतीनेच केला आहे. उप महापौर महिलेच्या पतीनेच स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांना पकडले. यानंतर 45 वर्षीय विवाहित सरकारी अधिकारी वेई फेंग यांना 13 जानेवारी रोजी पदावरून हटवण्यात आले. अधिकृत तपासात त्यांच्यावरील आरोप योग्य असल्याचे समोर आले होते. अधिकाऱ्याचे उपमहापौरांशी संबंध असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उपमहापौरांचे नाव दाई लू असल्याचे समोर आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती तयार केली होती. यामध्ये वेई आणि दाई यांचा एकमेकांशी 'अयोग्य संपर्कात' असल्याचे आढळून आले.