इस्लामाबाद : पाकिस्तानने (Pakistan) भारताचा (India) किती धसका घेतलाय हे नुकतंच एका प्रसंगातून उघड झाले आहे. अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman)  यांना भारताच्या हवाली करताना शांततेसाठी हे पाऊल उचलल्याची हाकाटी पंतप्रधान इम्ररान खान पिटत होते. मात्र आता खरे काय झाले हेच पाकिस्तानच्या एका खासदाराने उघड केले. पाकिस्तानला भारत पुन्हा जोरदार हल्ला करेल, अशी भीती सतावत होती असे या खासदाराने म्हटले आहे. 


अभिनंदनच्या सुटकेविषयी काय सत्य  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान  (Abhinandan Varthaman) यांची केवळ पाकिस्तानने शांततेसाठी सुटका केलीली नाही. तसेच पाकिस्तानला भारताशी संबंध बिघडवायचे नव्हते, असे सांगितले गेले. मात्र, पाकिस्तानला जास्त भीती होती ती भारत त्यांच्यावर हल्ला करेल. अभिनंदनच्या मायदेशी परतल्यानंतर पाकिस्तानी खासदार अयाज सादिक (ayaz sadiq) यांनी इम्रान सरकारची भीती उघड केली आहे.


विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan आणि परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात चर्चा झाली. कुरेशी यांनी असेही म्हटले होते की, भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे, त्यामुळे अभिनंदन यांना सोडणे आवश्यक आहे, असा दावा अयाझ यांनी केला आहे. 



इम्रान बैठकीला आले नाही


संसदेतील भाषणात अयाज यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, आम्ही कुलभूषणसाठी अध्यादेश आणला नाही. या आदेशानुसार आम्ही कुलभूषण यांना आम्ही एक्सेस दिलेला नाही. ते पुढे म्हणाले, 'अभिनंदनबद्दल तुम्ही काय बोलता, शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख त्या बैठकीत होते. कुरेशी म्हणाले होते की, अभिनंदनला परत जाऊ द्या, खुदाचा वास्ता आहे. अभिनंदनला जाऊ द्या, रात्री नऊ वाजता भारत हल्ला करणार आहे. इम्ररान खान यांनी त्या बैठकीस येण्यास नकार दिला


भारत हल्ला करणार नसल्याचे अयाज म्हणाले. सरकारला फक्त गुडघे टेकून  अभिनंदन यांना पाठवायचे होते आणि ते झाले. त्या बैठकीत कुरेशीचे पाय थरथर कापत होते आणि  अभिनंदन यांना सोडले नाही तर भारत रात्री नऊ वाजता हल्ला करेल असे सांगून सर्वांना घाबरत होते. प्रत्यक्षात असे काहीही होणार नव्हते.


काय प्रकरण आहे ?


विशेष म्हणजे गेल्यावर्षी अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त झाले आणि ते पाक अधिकृत काश्मीरमध्ये फसले गेले. तेथून त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले. अभिनंदन यांना मानसिकरीत्या त्रास देण्याचा पाकिस्तानने खूप प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळू शकले नाही. अखेरीस १ मार्च रोजी पाकिस्तानला अभिनंदन यांना अटारी-वाघा सीमेवरून भारतात पाठवावे लागले.