मुंबई : झुरळ दिसताच अनेकजण त्याच्यापासून दूर पळतात. झुरळ दिसलं की काही मुली ओरडूही लागतात. आज आम्ही तुम्हाला झुरळाविषयी अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही याआधी कधीही ऐकल्या नसतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झुरळाचे डोकं कापल्यानंतरही ते 9 दिवस जगतं हे तुम्हाला माहीत आहे का? जर त्याचं डोकं कापलं गेलं असेल तरीही त्यांचं शरीर 9 दिवस जगतं (आठवड्यानंतर झुरळांचा मृत्यू) आणि सोबतच त्याचे पाय फिरत राहतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोकं कापल्यानंतर कोणताही प्राणी जिवंत कसा राहू शकतो? मुळात हे कोणत्याही चमत्कारामुळे किंवा जादूमुळे जगत नाहीत, परंतु त्यांच्या शरीरात एक खासियत असते.


वास्तविक, झुरळं नाकातून श्वास घेत नाहीत. उलट त्यांच्या शरीरात अनेक छोटी छिद्रं असतात. या छिद्रातून ते श्वास घेतात. त्यामुळे डोकं कापल्यानंतरही चे जिवंत राहतात.


झुरळं 9 दिवसांनंतर जगू शकत नाहीत कारण ते त्यांच्या डोक्याच्या माध्यमातून खातात. खाण्याद्वारे ते आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्रथिनं साठवून ठेवतो. यामुळे जेव्हा त्यांचं डोकं कापलं जातं तेव्हा तो 9 दिवस जिवंत राहतो, परंतु त्यानंतर भूक आणि तहानने त्याचा मृत्यू होतो.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वात जास्त गॅस सोडण्याऱ्या किटकांपैकी एक आहे. ते दर 15-15 मिनिटांनी गॅस सोडत राहतो. गरज पडल्यास झुरळ 40 मिनिटं श्वास रोखू शकतात. या कारणास्तव, झुरळं 30 मिनिटं पाण्यात टिकून राहतात. झुरळाचं सरासरी आयुष्य एक वर्ष असतं. झुरळ 5 मीटर प्रति सेकंद या वेगाने धावू शकतात.


झुरळाला 18 पाय असतात. ज्याप्रमाणे माणसाच्या डोक्यावर केस वाढतात, त्याचप्रमाणे झुरळाचा पाय मोडला तर ते पुन्हा येतात. जगातील सर्वात मोठं झुरळ दक्षिण अमेरिकेत 6 इंच आकाराचं आढळलंय. तसं, सामान्य झुरळं दीड ते दोन इंच मोठे असतात.


झुरळे सर्व काही खाऊ शकतात. ते साबण, पेंट, पुस्तकं, लेदर, गोंद, ग्रीस आणि तुमचे केस देखील खाऊ शकतात. लहान मुलांमध्ये ऍलर्जी आणि दम्यासाठी सर्वात जास्त कोणी जबाबदार असेल तर ते झुरळे आहेत. ते 33 विविध प्रकारचे जीवाणू पसरवतात.