मुंबई : जन्मानंतर प्रत्येत व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे, असं आपण सर्व मानतो. पण तुम्हाला माहित आहे का की, भारतात अशी एक जागा आहे जिथे कोणी मरत नाही. असं म्हणतात की, या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नशीब आधीच ठरलेलं आहे आणि इथे राहणारा प्रत्येकजण अमर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही ज्ञानगंज मठाबद्दल तुम्हाला सांगतोय. हे ठिकाण रहस्यांनी भरलेलं आहे. असंच एक रहस्य हिमालयाच्या दऱ्यांमध्ये दडलेलं आहे, जे आजपर्यंत कोणीही शोधू शकलेलं नाही. ज्ञानगंज मठ हे हिमालयातील एक अतिशय लहान ठिकाण आहे ज्याला शांग्रीला आणि शंभला असेही म्हणतात. हे एक रहस्यमय ठिकाण आहे, ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


ज्ञानगंजची कॉन्‍सेप्‍ट


ज्ञानगंज ही प्राचीन भारतीय आणि तिबेट कथा म्हणून ओळखली जाते. ही कथा आहे एका शहराची, जी आजपर्यंत जगापासून लपलेली आहे. तिबेट खूप प्रसिद्ध असून ऋषीमुनी तपश्चर्येत लीन राहत असायचे असं मानलं जातं. रामायण आणि महाभारतातही याचा उल्लेख आहे. शास्त्रात त्याला सिदाश्रम म्हणतात.


या ठिकाणी भगवान बुद्धांनी कालचक्र ज्ञान प्राप्त केलं, असे बौद्ध धर्माचे लोक मानतात. बौद्ध धर्माचे लोक या अध्यात्मिक शक्तीच्या केंद्राकडे जाण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. मात्र खरं सांगायचं तर आजपर्यंत त्यांना या ठिकाणी जाण्याचा मार्ग सापडला नाही. सॅटेलाइटमध्ये देखील ही जागा सापडत नाही.