कंडोमला सुईने पंक्चर केलं, पण त्याला न समजू देता...अखेर महिलेला जेल
ही बातमी कंडोमशी संबंधित असली, तरी अनेक देशांमध्ये दोन व्यक्तींमध्ये शारीरीक संबंध होत असतील तर त्यालाही काही कायदे आहेत. इतर देशात
बर्लिन : ही बातमी कंडोमशी संबंधित असली, तरी अनेक देशांमध्ये दोन व्यक्तींमध्ये शारीरीक संबंध होत असतील तर त्यालाही काही कायदे आहेत. इतर देशात आपण नैतिकतेच्या जोरावर हे ठरवू शकतो की, एकाच्या परवानगीनेच हे करणे अयोग्य आहे. पण जर्मनीच्या बर्लिनमध्ये या महिलेने जे कृत्य केलं, त्यावर तिला जेलची हवा खावी लागत आहे.
ती त्याच्या प्रेमात होती...
या महिलेला त्या व्यक्तीपासून मुल हवं होतं, म्हणून तिने त्याला न समजू देता, कंडोमला सुईन छिद्र केलीत.या महिलेवर आपल्या मित्राचे स्पर्म चोरी केल्याचा आरोप आहे. तिने कंडोमला सुईने छिद्र केली आणि स्पर्म चोरी केली असा आरोप तिच्यावर आहे.
ऐनवेळी कंडोम हटवला म्हणजे स्टिल्थिंग
अर्थात या महिलेला या व्यक्तीकडून गर्भवती व्हायचं होतं.पण तिने या व्यक्तीची परवानगी न घेता चोरुन असं केलं, म्हणून तिच्यावर 'स्टिंल्थिंग'चा आरोप आहे. अर्थात कंडोमसोबतची हे छेडछाड 'स्टिंल्थिंग' मानली जात आहे. स्टिल्थिंगचा अर्थ आहे, पुरुषाने महिलेची परवानगी न घेता शरीरसंबंधावेळी कंडोम हटवला म्हणजे स्टिल्थिंग.
'फ्रेन्डस विथ बेनिफिट'
कोर्टाने यावर म्हटलं आहे, ३९ वर्षाच्या महिलेने आपल्या ४२ वर्षाच्या पुरुषासोबत शरीर संबंध ठेवले,कोर्टने या सबंधांना 'फ्रेन्डस विथ बेनिफिट' असं म्हटलं, ज्यात मित्रांमध्ये शारीरीक संबंध होतात, पण त्यात कोणतंही प्रेम नसतं.
महिलेकडून मेसेज करुन माहिती...
ते २०२१ पासून संपर्कात होते, स्थानिक कोर्टाने सांगितलं की, महिलेच्या मनात तिच्या मित्राविषयी प्रेम वाढत होतं. पण त्याच्या मनात अशी कोणतीही भावना नव्हती. तो आपल्या सामान्य ओळखीने आणि बोलण्याने खुश होता.
सुईने मी कंडोम पंक्चर केला आणि आता ...
यांच्यात पुढे शारीरीक संबंध आले, आणि एका संबंधानंतर या महिलेने त्याला मेसेज करुन सांगितलं की, सुईने मी कंडोम पंक्चर केला आणि आता मी प्रेग्नेंट आहे. पुढे ती गर्भवती होण्यास अपयशी झाली, तो भाग आणखी वेगळा.
प्रेमाची कबुली
तिचा मेसेज वाचल्यानंतर त्याने तिच्याविषयी तक्रार दाखल केली.महिलेवर गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कोर्टात तिने ही गोष्ट मान्य केली ,मी त्याला आपला बनवू इच्छित होते. ती त्याच्या प्रेमात होती.
ऐतिहासिक निर्णय
यावर सुनावणी करताना जजने सांगितलं, आज आम्ही ऐतिहासिक निर्णय देत आहोत, स्टील्थिंग तेव्हा होतं, जेव्हा पुरुष कंडोमला हटवतो. पण आता हे प्रकरण उलट देखील मानलं जाणार. कारण नको'चा अर्थ नको असाच होतो. या महिलेला ६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.