Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकड संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.  23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश आहे. तर,  दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे जगभर कौतुक होत आहे.  भारताच्या चांद्रयान 3 मोहिमच्या यशानंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया देताना स्वत:चे हसू करुन घेतलं होत. आता मात्र, भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर यान पाठवणार आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान मून मिशन राबवणार आहे. 


चीन आणि पाकिस्तानचे संयुक्त मून मिशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनची स्पेस एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA)  चीन आणि पाकिस्तानचे संयुक्त मून मिशन फत्ते करणार आहे. 2024 मध्ये  चीन हे चान्गई-6 चाँग मिशन राबवणार आहे. चीनच्या  चांगई-6  मिशन मध्ये पाकिस्तानही सहभागी होणार आहे. चीनच्या यानासह पाकिस्तानही आपला एक पेलोड चंद्रावर पाठवणार आहे.


पाकिस्तानचे अतिशय सूक्ष्म यान चंद्रावर जाणार


भारताच्या यशानंतर पाकिस्तानने मून मिशन जाहीर केले आहे.  पाकिस्तानचे अतिशय सूक्ष्म यान चंद्रावर जाणार आहे. पाकिस्तानचे हे यान  साधारणपणे 1x1 फूट आकाराचे चौकोनी बॉक्सच्या आकाराचे आहे. या वर्षी पाकिस्तानने चीनच्या तियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर काही बिया पाठवल्या होत्या. जेणेकरून तिथे संशोधन करता येईल. चीनच्या मदतीने पाकिस्तान आंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहे. 


काय आहे चीनचे मून मिशन


चंद्र आणि पृथ्वी यांच्यात संवाद प्रस्थापित चीन मून मिशन रावबत आहे. यासाठा चीन Queqiao-2 किंवा Magpie Bridge-2 उपग्रह चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे.  चांगई-6 मोहिमेअंतगर्त चीन चंद्राच्या अत्यंत गडद भागात संशोधन करणार आहे. अद्याप येथे कोणतेही संशोधन झाले नसल्याचा दावा चीनने केला आहे. हा भाग  दक्षिण ध्रुवाजवळच आहे. चीनच्या चांगई-6 मोहिमेत फक्त पाकिस्तानच नाही तर अनेक देश सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे डोर्न रेडॉन डिटेक्शन इन्स्ट्रुमेंट, युरोपियन स्पेस एजन्सीचे निगेटिव्ह आयन डिटेक्टर, इटलीचे लेझर रेट्रोरेफ्लेक्टर आणि पाकिस्तानचे क्यूबसॅट्स अर्थता छोटे उपग्रह यांचा समावेश आहे.