नवी दिल्ली : रशिया अजूनही कोरोना (corona) महामारीतून सावरलेला नाही. येथे दररोज 25 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. गेल्या 24 तासात रशियामध्ये 29,362 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवण्यात आली. एका दिवसापूर्वी 27,246 प्रकरणांची नोंद झाली होती. रशियातील (Russia) कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 7 लाख 46 हजार 718 झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या प्रकरणांविषयी माहिती देताना रशिया सरकारने सांगितले की, मागील दिवशी देशातील 85 वेगवेगळ्या भागात 29,362 कोरोना प्रकरणांची पुष्टी झाली आहे. मॉस्कोमध्ये 6,001 दैनंदिन संसर्गासह सर्वाधिक नवीन प्रकरणे आहेत, जी एक दिवसापूर्वी 4,595 होती. रशियाच्या राजधानीपाठोपाठ सेंट पीटर्सबर्गमध्ये 2,717 प्रकरणे वाढली आहेत, जी एका दिवसाआधी 2,501 होती.


रशियन सरकारने एका दिवसात कोरोनाशी संबंधित 968 मृत्यूंची एक नवीन नोंद केली आहे, एक दिवस आधी ही संख्या 936 होती देशातील मृतांची संख्या 2,15,453 वर पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 21,049 लोक कोरोना संसर्गापासून बरे झाले आहेत, एक दिवसा आधी 20,566 लोक संसर्गातून बरे झाले होते. एकूणच, देशातील 6 लाख 84 हजार 845 लोकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.


ब्राझीलमध्ये मृतांची संख्या 6 लाखांवर


ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या 6 लाखांवर पोहोचली आहे. ब्राझीलच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सध्या अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मृतांची संख्या 6 लाख 42 वर पोहोचली आहे.


वृत्तसंस्था सिन्हुआने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,172 नवीन रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 2 कोटी 15 लाख 50 730 वर गेली आहे, जी सध्या अमेरिका आणि भारतानंतर कोरोना संक्रमित तिसऱ्या क्रमांकावर आहे.