मुंबई : जगभरातील एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की कोरोना संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांमध्ये बाळाच्या जन्मादरम्यान मृत्यूची शक्यता वीस पटीने वाढते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील 2100 गर्भवती महिलांवर केलेल्या संशोधनात हा निष्कर्ष पुढे आला आहे. 18 देशांच्या 43 प्रसूती रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या संशोधनात दोन्ही गटांमध्ये तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. एका गटातील गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती, तर दुसर्‍या गटाच्या महिलांमध्ये अशा प्रकारचे संक्रमण नव्हते. जामा पेटीएट्रिक्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, आई आणि बाळाच्या मृत्यूच्या जोखमीशिवाय, त्यांना प्रसुतीची समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे.


अभ्यासात असे आढळले आहे की, मातांसह 11.5 टक्के अर्भकांनाही संसर्ग होता. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या गर्भवती महिलांमध्ये लठ्ठपणा, उच्च बीपी किंवा मधुमेह होता त्यांना सर्वात जास्त धोका होता. यूडब्ल्यू स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रसूती व स्त्रीरोग तज्ञाचे प्राध्यापक मायकेल ग्रेव्हॅट म्हणाले की, गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास आजार होण्याची शक्यता असते.


त्याच वेळी, मेड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासामध्ये वैज्ञानिकांना असे आढळले की, कोरोना विषाणू प्लेसेंटामध्ये आढळणे फारच कमी आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, शेली फरहादियन म्हणतात की, नाळ संसर्गाविरूद्ध तीव्र प्रतिकारशक्ती आहे. हा अभ्यास अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे.