Corona | अरे देवा! येत्या काही दिवसात पुन्हा कोरोनाचा कहर वाढणार?
चीनमध्ये दिवसागणिक कोरोना (Corona in China) रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं इथं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
मुंबई : चीनमध्ये दिवसागणिक कोरोना (Corona in China) रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं इथं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. अशातच WHOनं जगभरातल्या देशांना गंभीर इशारा दिलाय. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर साऱ्या जगानं सुटकेचा निश्वास टाकला खरा. मात्र चीनमधून पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आणि जगाचं टेन्शन वाढलं. (corona patients in China is increasing world health organisation has issued a stern warning to countries around world)
चीनमध्ये नव्या व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे तिथं पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आलीय. अशातच WHOनेही साऱ्या जगाला धोक्याचा इशारा दिलाय. करोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ का होऊ लागली? यासंदर्भात WHOनं काही अंदाज वर्तवले आहेत.
काही दिवसांत कोरोनाचा कहर?
कोरोना रूग्णांच्या वाढीला निर्बंधांमधली शिथीलता कारणीभूत असल्याचं WHOनं म्हंटलय. याशिवाय ब-याच देशांमध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज आहेत. शिवाय जनजागृतीचा अभाव आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय असं निरीक्षण WHOनं नोंदवलंय. सध्या सुरू असलेली रूग्णवाढ हे फक्त हिमनगाचं टोक आहे असं सांगत WHOनं भविष्यातील धोक्याचा इशारा दिलाय.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जगभरात बाधितांची संख्या तब्बल 8 टक्क्यांनी वाढलीय. चीन आणि दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेला हलक्यात घेऊ नका.