नवी दिल्ली : भारताकडून (India) आता श्रीलंकेलाही (Sri Lanka ) लसींचं (Corona vaccine) गिफ्ट दिले जात आहे. आज एअर इंडियाच्या विशेष विमानाने कोव्हिशिल्ड लस श्रीलंकेला रवाना होत आहे. तिथल्या बंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून हे डोस श्रीलंकेला सुपूर्द केले जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गेल्याच आठवड्यात भारताने भूतान, मालदिव्ज, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशियसला लसींचं गिफ्ट दिले आहे. आता यात श्रीलंकेचंही नाव जोडले गेले आहे. श्रीलंका येत्या दोन दिवसांत भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूटकडून (Serum Institute of India)ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस (Oxford-Astrazeneca Vaccine) चे 20 लाख ते 30 लाख डोस खरेदी करेल. श्रीलंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने बुधवारी ही माहिती दिली. गुरुवारी श्रीलंकेला मोफत या लसी दिल्यानंतर हे लस भारतातून घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे सल्लागार ललित वीरतुंगा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की भारतीय कोविशिल्टची लस उद्या येत आहे आणि हे साहित्य कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती राजपक्षे घेतील.


कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. श्रीलंकेतही धोका निर्माण झाला आहे. भारतासह जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 10 कोटींवर पोहोचलीय तर 21 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1 कोटी 6 लाख 89 हजार 527 वर गेला आहे.