नवी दिल्ली : कोरोनो प्रादुर्भावामुळे साऱ्या जगावर संकट ओढवलंय. त्यामुळे कोरोनावर मात करणारी लस सर्वात आधी कोण शोधणार यामध्ये अनेक देशांमध्ये चढाओढ होताना दिसतेय. यातील अनेक प्रयत्न अयशस्वी देखील झाले. या पार्श्वभुमीवर रशियाने लस अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केलाय. त्यानुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही लस जगभरात पोहोचू शकते. वॅक्सीनच्या मंजुरीसाठी १० ऑगस्टपर्यंत लस आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही वॅक्सीन वेगवेगळ्या चाचण्यांमधून जात आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही वॅक्सीनची चाचणी केली जाईल. मास्कोतील गामालेया इंस्टिट्यूटमध्ये हे वॅक्सिन बनवण्यात आलंय. १० ऑगस्टपर्यंत सर्वसाधारण व्यक्तींच्या उपयोगात हे वॅक्सिन आणून मंजुरी देण्याच्या प्रयत्न सुरु असल्याचे वैज्ञानिक सांगतायत. 



माहिती चोरल्याचा आरोप 


संपूर्ण जग वॅक्सिनच्या प्रतीक्षेत असताना अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि रशिया यांच्यात वाद-विवाद होत आहे. अमेरिका, यूके आणि कॅनडा (United States,UK and Canada) यांनी आरोप केला आहे की रशियाने (russia) त्यांच्या कोव्हीड -१९ लस (COVID-19 vaccine) संशोधनाची माहितीची चोरी केली आहे. 


तिन्ही देशांच्या सरकारने असा दावा आहे की, रशियन समर्थक हॅकर्स कोरोना लस बाबतच्या संशोधनात गुंतलेल्या वैद्यकीय संस्था आणि विद्यापीठांवर सायबर हल्ले करून संशोधन चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


तिन्ही देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की,  APT29 (Cozy Bear) नावाच्या हॅकिंग गटाने त्यांच्या संशोधनाशी संबंधित माहिती चोरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.


मात्र रशियाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोप रशियाकडून फेटाळण्यात आले आहे. रशियाने पहिली कोरोना लसची चाचणी घेतली आहे.