मुंबई : जगभरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून corona virus कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळत आहे. या व्हायरसची लागण नेमकी कुठून होते हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर तर आहे. प्राथमिक स्तरावर हा व्हायरस वटवाघुळामुळे पसरत असल्याचंही म्हटलं गेलं. पण, चीनकडूनच करण्यात आलेल्या एका संशोधनात एक नवा आणि तितकाच महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार मानुष्य प्रजातीमध्ये कोरोना व्हायरस पँगोलिन Pengolin या प्राण्यापासून पोहोचला आहे. या प्राण्यामुळे कोरोना व्हायरस पसरत असल्याचा दावा केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


व्हायरसचा डीएनए ९९% समान... 


पँगोलिन या प्राणाची प्रजात अतिशय दुर्मिळ आहे. हा स्तनधारी वन्यजीव इतर स्तनधारी वन्यजीवांपेक्षा फार वेगळा दिसतो. शिवाय त्याचा आकारही काहीसा वेगळाच असतो. खजुराच्या झाडावर असणाऱ्या खवलांप्रमाणे या प्राण्याचं शरीरही खवलांच्या एका टणक आवरणाने अच्छादलेलं असतं. दूरून पाहिल्यास हा एखाद्या लहान डायनासोरप्रमाणे दिसतो. पँगोलिन हा प्राणी कीडे, मुंग्या खातो. 


चीनकडून लावण्यात आलेल्या शोधानुसार कोणा एका व्यक्तीने हा प्राणी खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण मनुष्य प्रजातीमध्ये झाल्याची शक्यता आहे. 




वटवाघळांमुळे कोरोना पसरण्याची शक्यता कमी...  


शास्त्रज्ञांनी केलेला दावा पाहता, वटवाघुळांमध्ये कोरोना व्हायरसचा अंश सापडतो. पण, या व्हायरसची मनुष्याला लागण होण्याची शक्यता कमी आहे. वटवाघुळापेक्षा तो पँगोलिनमार्फत मानवी शरीरात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. चीनकडून करण्यात आलेला हा दावा अद्याप WHOकडून मान्य करण्यात आलेला नाही. याला मान्यता मिळताच व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लसीचा शोध लावण्यास यश मिळू शकतं.