नवी दिल्ली : सारं जग कोरोना विषाणूच्या विळख्यात जगत असतानाच संपूर्ण जगाला कोरोनाच्या या दरीत लोटणाऱ्या चीनमध्येपुन्हा एकदा मोठा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा फैलाव इथं पुन्हा अतिशय वेगानं होत असल्यामुळं सरकार नाईलाजानं पुन्हा कठोर पावलं उचलण्यास लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची नवी लाट रोखण्यासाठी कोट्यवधींची लोकसंख्या असणाऱ्या या देशात काही नियमांची सक्ती करण्यात येत आहे. 


त्यातच आता 1.3 कोटी इतकी लोकसंख्या असणाऱ्या शियान या शहरात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 


अत्यावश्यक कारणं वगळता घराबाहेर पडू नये असं इथं सांगण्यात आलं आहे. शिवाय अपवाद वगळता शहरातील दळणवळणाची साधनंही बंद ठेवण्यात आली आहेत. 


24 तासांत 54 नवे रुग्ण 
शियानमध्ये लागू करण्यात आलेल्या आदेशांनुसार दर दोन दिवसांतून घरातील एक व्यक्ती घरगुती कामाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडू शकेल. 


शियानमध्ये सर्वप्रथम 24 तासांत 54 कोरोना रुग्ण आढळले होते. ज्यानंतर हा आकडा 143 वर पोहोचल्यामुळं तणाव आणखी वाढला. 


इथं सरकारनं दिलेल्या आदेशानुसार लांब पल्ल्यांची बस स्थानकं बंद करण्यात आली आहेत. तर, अनेक रस्त्यांवर इथं चेकपोस्ट सुरु करण्यात आल्या आहेत. 


शहरातील मुख्य विमानतळावर येणाऱ्या 85 टक्के उड्डाणांना सद्यस्थिती पाहता रद्द करण्यात आलं आहे. 


2019 च्या अखेरीस चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाची चाहूल लागली आणि पाहता पाहता या देशामध्ये कोरोनानं थैमान घातलं. 


पुढे साऱ्या जगानं कोरोनाचं रौद्र रुप पाहिलं. त्यामुळं आता कोरोनाच्या नव्या लाटेमध्ये सर्वत स्तरांवर विविध देशांमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्यात आली आहे.