लंडन: जगभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे. डेल्टाचा धोका काही देशांमध्ये वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून आपण बचाव करण्यासाठी सतत सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुवण्याचा पर्याय अवलंब करत आहोत. मात्र एक कंपनी कर्मचाऱ्यांच्या हात धुवण्यासाठी हात धुवून मागे लागली. याचा फटका त्या कंपनीला मोठा बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोगापेक्षा इलाज भयंकर हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल तसाच काहीसा प्रकार इथे घडला आहे. एका कंपनीने दिवसातून 20 वेळा नागरिकांना सतत हात धुवण्याता तगादा लावला होता. त्याचा उलट इफेक्ट झाला आणि कंपनीच धक्क्याला लागली म्हणायला हरकत नाही. सुसान रॉबिन्सन नावाच्या कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या वेळेत 20 वेळा हात धुवण्याची बळजबरी केल्याचा धक्कादायक खुलासा केला. 


कामाच्या वेळेत 20 वेळा साबणाने हात धुतल्याने त्याला त्वचेचे आजार झाला. त्यामुळे त्याचा उपचार आणि सगळाच खर्च खूप मोठा असल्याने त्याने कंपनीच्या विरोधात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. याशिवाय या कंपनीच्या नियमांमुळे हे घडल्याचा दावा त्याने ठोकल्याने कंपनीसमोर अडचणी निर्माण झाल्या. पर्यायाने त्याला  43 लाख 81 हजार 495 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली. 


59 वर्षीय सुसान रॉबिन्सन वेस्ट यॉर्कशायर इथे वेकफील्डमध्ये एका कारखान्यात स्पीडीबेक म्हणून काम करतात.  कंपनी मोठ्या सुपरमार्केट चेन मफिन, कपकेक आणि इतर पदार्थांसाठी लागणारं सामान तयार करते. तर क्रिसमसच्या तयारीसाठी त्यांनी शेकडो फ्रोजन खिमापावांचं उत्पादन आधीच केलं आहे. Mirrorने दिलेल्या वृत्तानुसार सहा महिन्यांत दिवसाला 17 वेळा हात धुवायला लागायचे. त्यामुळे त्याच्या हाताना कायम खास सुटायची आणि त्यामुळे त्याला त्वचेचा आजार झाला. 


पोन्टेफ्रॅक्ट रुग्णालयात जेव्हा काही चाचण्या करण्यात आल्या तेव्हा समजलं की स्क्रीनमध्ये रासायनिक संपर्क वाढल्याने त्याला एक प्रकारचा एक्झिमा झाला. कंपनीने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सतत हात धुवण्याचा उपाय तर केला मात्र त्यामुळे नवीन आजार झाला. कंपनीने देखील त्याला अनेक सल्ले दिले. मात्र कंपनीत तयार होणारं फूड त्याच्या हातामुळे खराब होई अशी भीतीही होती. 



कंपनीने रॉबिन्सनची गोष्ट धुडकावून लावली. त्याने संघाकडे मदतीचा हात मागितला. त्याने बेकर्स फूड एंड एलाइड वर्कर्स यूनियनला आपलं दु:ख सांगतलं. त्याची व्यथा मांडली. थॉम्पसन सॉलिसिटर यांच्याकडूनही मदतीचा हात मिळाला. 43,81,495 रुपये त्याला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात युनियन आणि संस्थेनं मदत केली. 


स्पीडीबेक फॅक्ट्रीमध्ये गेल्यावर्षी आग लागल्याने काम बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर या कारखान्याला स्थलांतरीत करण्यात आलं. कोरोनाचा धोका असल्याने कारखान्यात खूप जास्त अतिकाळजी घेतली जात होती. खाद्यपदार्थ तयार करण्याची कंपनी असल्याने एवढी काळजी घ्यावी लागत असल्याचं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे.