मुंबई : इटली, स्पेननंतर कोरोना व्हायरसचं सर्वात मोठं तिसरं केंद्र अमेरिका होत आहे. अमेरिकेत गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. शनिवारी कोरोना पीडितांच्या संख्येत वाढ होऊन १९ हजारांवर पोहोचली होती. जगभरात कोरोनाची लागण झालेला आकडा हा ७ लाखाच्या वर गेला आहे. असं असूनही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात ७ लाख २० हजारावर रुग्णांना कोरोनाती लागण झाली आहे. मृत्युचा आकडा ३४ हजाराच्या घरात पोहचला आहे. रविवारी दिवसभरात ३१०५ कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी ३ हजारावर मृत्यू झाले आहे. जगभरात दर मिनिटाला २ मृत्यू होत असल्याची नोंद आहे. अमेरिकेत आतापर्यंत २४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत दीड लाखाहून अधिक कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. 


जगभरात या महामारीमुळे ३४ हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. फक्त युरोपमध्ये २२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५०% हून अधिक इटली-स्पेनमधील नागरिकांचा समावेश आहे. इटलीत मरणाऱ्यांची संख्या ही १० हजारहून अधिक आहे. तर स्पेनमध्ये ६८००  लोकांचा मृत्यू होऊन दिवसाला ९.१ टक्क्यांनी वाढत आहे. 


या जागतिक साथीच्या रोगामुळे जगभरात ३४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७,०२,३६८ लोकांना याची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे १,४९,२१५ लोकं कोरोनामुक्त झाले असून आपापल्या घरी गेले आहेत. यामुळे कोरोनाचा रूग्ण बरा होऊ शकतो यावरचा विश्वास वाढला आहे.  


 जगभरामध्ये परसलेल्या कोरोना व्हायरसने इराणमध्ये थैमान घातलं आहे. इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २,६४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८,३०९ जणांना कोरोना झाला आहे. कोरोनामुळे आखाती देशांमधल्या इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.


'मागच्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २,९०१ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे इराणमधला कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८,३०९ झाला आहे,' असं इराणच्या आरोग्य मंत्र्यांचे सल्लागार अलीरझा वहाबजादेह यांनी केलं आहे. १२,३९१ जण कोरोनातून बरे झाल्याचंही ते म्हणाले.


'इराणमध्ये कोरोनाच्या ३,४६७ रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. पण १२,३९१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत, ही दिलासादायक गोष्ट आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं सरासरी वय ६९ वर्ष आहे,' अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कियानुष जहानपूर यांनी दिली आहे.