जगभरात कोरोनामुळे १ लाख ३४ हजार लोकांचा बळी
जगभरात कोरोनाचं थैमान
मुंबई : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत जभरात कोरोनामुळे १ लाख ३४ हजार लोकांचा बळी गेला आहे. जगात २० लाख ८२ हजार कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झाली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचं सावट अधिकाधिक गडद होत चाललं आहे. त्याचप्रमाणे देशभरात ५ लाख १० हजार ३२९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.
अमेरिकेत गेल्या २४ तासांत २,६०० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. अमेरिकेत कोरोनाच हाहाकार माजा आहे. आतापर्यंत अमेरिकेत बळींची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. जगभरात आता ८६५ हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे.
स्पेनमध्ये १ लाख ८० हजार ६५९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये १८,८१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीत १ लाख ६५ हजार १५५ लोकं कोरोनाबाधित असून २१,६४५ लोकांचा मृत्यू झालाय. फ्रान्समध्ये १ लाख ४७ हजार ८६३ कोरोनाग्रस्त आढळळे असून १७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
तसेच २६८ ब्रिटीश नागरिक जे लॉकडाऊनमुळे केरळात अडकले होते. त्यांना त्रिवेंद्रम इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टरून ब्रिटीश एअरवेझने घेऊन जाण्याची सोय केली.