सेऊल : Covid News : आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) यावर चिंता व्यक्त केली आहे. भारतात मात्र, कोरोनाची तिसरी लाट  (Third Wave of Corona) आता थांबली आहे आणि दैनंदिन संसर्गाची प्रकरणे 3000च्या खाली आली आहेत. मात्र चीन, हाँगकाँग, सिंगापूरनंतर आता दक्षिण कोरियामध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाचे इतके रुग्ण समोर आलेले नव्हते.


कोविड चाचणीवर मोठा भर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरियाच्या व्हायरस फायटर्सचे म्हणणे आहे की दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड चाचणी केल्या जात आहेत. कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गुरुवारी एका दिवसात तेथे विक्रमी 6,21,317 कोरोना रुग्ण आढळले. कोरियन प्रशासनाने संक्रमित व्यक्तीची प्रकृती गंभीर होण्यापूर्वी काही रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


मृत्यू दराच्याबाबतीत दिलासा


कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी एक दिलासादायक बाब आहे. विक्रमी नवीन रुग्णांची संख्या असूनही, दक्षिण कोरिया हा विषाणूमुळे सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये आहे. साधारणपणे, जेव्हा कोरोना संसर्गाचा दर वाढतो तेव्हा त्याचा मृत्यू दर देखील वाढतो, परंतु दक्षिण कोरियामध्ये असे दिसून आलेले नाही.


दक्षिण कोरोनाने कधीही लॉकडाऊन लावले नव्हते


जगात कोरोनाचा कहर सुरु असताना कोरियामध्ये कोठेही लॉकडाऊन लावला नव्हता. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर अपारंपरिक धोरणावर काम केले आहे. कोरियाने जलद कोरोना चाचणी आणि उच्च-तंत्र संपर्क ट्रेसिंगचा वापर केला. 2020 च्या सुरुवातीपासून येथे 8 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.