धक्कादायक ! आरोग्य मंत्र्यांनाचा कोरोना व्हायरसची लागण
एक दिवस आधी जेव्हा त्यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांना खोकला येत होता आणि घामही येत होता. आपल्याकडे ज्या
तेहरान : इराणची राजधानी तेहरानपासून 150 किमी दूर असणाऱ्या कोम शहरात 15 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोम शहराच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, हा आकडा 50 च्या वर आहे. तसेच सरकारने हे मान्य करण्यास वेळ घालवला. मेडिकल सायन्स युनिवर्सिटीच्या प्रमुखांनी मीडियाला सांगितलं की, आरोग्य मंत्रायलयाने कोरोना व्हायरसचा आकडा बाहेर सांगण्यास मज्जाव केला आहे.
या आरोपांना उत्तर देण्यासाठी आरोग्यमंत्री टीव्हीवर आले, त्यांनी हे देखील सांगितलं, जर कोरोनात झालेल्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये थोडीशीही तफावत असेल तर मी राजीनामा देईन.
पण धक्कादायक बाब म्हणजे, आरोग्यमंत्र्यांनाच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. एक दिवस आधी जेव्हा त्यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांना खोकला येत होता आणि घामही येत होता. आपल्याकडे ज्या प्रमाणे राज्यमंत्री असतात, त्या प्रमाणे इराणमध्ये उपआरोग्य मंत्री आहेत, त्यांना हा व्हायरसची लागण झाली आहे.
पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की, कोरोना व्हायरस चीनी मजूर आणि पाकिस्तानच्या तीर्थ यात्रींमुळे इराणमध्ये आला. पण नंतर इराणच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं, 'शक्यता अशीच असू शकते की, कोम या शहराच्या एका व्यापाऱ्यापासून हे संक्रमण झालं आहे.
कारण हा व्यापारी चीन आणि इराणच्या सतत व्यापारासाठी फेऱ्या मारत होता.' ज्या रूग्णाचा सुरूवातीला मृत्यू झाला तो, चीन आणि इराणमधील इनडायरेक्ट फ्लाईटसने ये-जा करत होता.
इराणमध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत. कोम शहरातील धार्मिक स्थळांवर सतत गर्दी होत असते. येथे काही दिवसांसाठी संक्रमण न होण्यासाठी प्रतिबंध केला, तर कट्टरपंथी मौलवी नाराज होतील.