मुंबई : कोरोना व्हायरस पसरण्याची इतकी कारण आहेत की, त्यावर आता ताबा मिळवणं कठीण झालं आहे. जगभरातील अनेक देश या कोरोना व्हायरसमधून वाचण्यासाठी अनेक पर्याय शोधत आहेत. याच धर्तीवर इटली सरकारने काही फरमान जाहीर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने इटलीतील लोकांना एकमेकांना Kiss करण्याची बंदी घातली आहे. एवढंच नव्हे तर एकमेकांची गळाभेट घेण्यासही आणि हस्तांदोलन करण्यासही मज्जाव केला आहे. आपल्याला माहितच आहे इटलीत एकमेकांना किस करण्याची प्रथा आहे. अनेक दाम्पत्य सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करताना दिसतात. (कोरोना व्हायरस : चीनमधील नागरिक घराबाहेर पडले पण....)


कोरोना व्हायरसचं संक्रमण सर्वाधिक ज्या देशांमध्ये झाला आहे. त्यामध्ये इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या देशात व्हायरसमुळे 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2500 हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. इटली सरकारचं म्हणणं आहे की,'व्हायरसचे संक्रमण बघता सरकारने सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे.' एवढंच नव्हे तर इटलीमधील सर्व फुटबॉल सामने रद्द केले आहेत. तसेच सर्व संगीत कार्यक्रम देखील रद्द केले आहे. इटलीच्या शिक्षा मंत्री लुसिया एजोलिना यांच म्हणणं आहे की,'आम्ही सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा विचार करत आहोत.'


भारतात आतापर्यंत 29 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. जगभरात कोरोना व्हायरसने आतापर्यंत 3,285 लोकांचा मृत्यू ढाला आहे. तर 95,481 लोकांना याची लागण झाली आहे. जगातील अनेक देशांमध्ये थैमान घालणारा कोरोना व्हायरसचा दिल्लीत शिरकाव झाल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आपण कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. मात्र, तरीही अनेक मुंबईकरांनी कोरोना व्हायरसची धास्ती घेतली आहे. यामुळे अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरायला सुरुवात केली आहे.