कोरोनाची येणारी साथ युद्धापेक्षाही भयंकर - बिल गेट्स
आताच्या कोरोना साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे. (Microsoft co-founder Bill Gates)
लंडन : 2020 हे वर्ष कोरोनाची (Coronavirus) साथ अन् लॉकडाऊननं गाजवले. आता 2021मध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती कोरोनाच्या लसीची. जगभरात लसीकरण मोहीम जोरात आहे. त्यामुळे थोडे रिलॅक्स झाला असाल तर थांबा ! कारण आताच्या साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा दिलाय मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बिल गेट्स यांनी. (Microsoft co-founder Bill Gates)
डेरेक म्युलर यांचा यूट्यूब चॅनल 'व्हेरीटाझियम'वर गेट्स यांनी नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्यांनी येत्या काळात आणखी भयंकर साथींना तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. रेस्पिरेटरी व्हायरस, म्हणजे श्वसनातून पसरणाऱ्या व्हायरसमुळे साथीचा धोका अधिक असल्याचं गेट्स यांनी म्हटले आहे. कारण हे व्हायरस उशिरा परिणाम दाखवायला लागतात आणि तोपर्यंत साथ पसरलेली असते. ईबोलासारख्या व्हायरसमध्ये हा धोका नाही.
तसेच नैसर्गिकरित्या पसरणाऱ्या साथीपेक्षा बायो टेररिझमचा जगाला अधिक धोका असल्याचं गेट्स यांनी म्हटलंय. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, हे समजले नसले तरी कोरोनाच्या साथीसाठी चीनला जगभरातून जबाबदार धरलं जात आहे. येत्या काही वर्षांमध्ये जैविक अस्त्रांच्या वापरामुळे एखादी महाभयंकर साथ पसरू शकते आणि ती रोखण्यासाठी आपण किती तयार असून याबाबत शंका आहे.
कोरोनाच्या साथीबाबत गेट्स यांनी 2015 सालीच इशारा दिला होता. टेड टॉक या कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेलं हे भाकीत तंतोतंत खरं ठरताना दिसतंय. त्यामुळे गेट्स यांनी दिलेल्या नव्या इशाऱ्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.