लंडन: कोरोना व्हायरसची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरवरून आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून बोरिस जॉन्सन होम क्वारंटाईन होते. मात्र, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवस उलटूनही बोरिस जॉन्सन यांच्यात कोरोनाची लक्षणे अजूनही दिसत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Coronavirus: पाकिस्तानकडून एअर इंडियाच्या पाठीवर शाबासकीची थाप

ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४७,८०६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४,९४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र  झालेल्या अमेरिकेत गेल्या २४ तासांत १२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत शहरातील तब्बल ६४, ९५५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २४७२ लोकांचा मृत्यू झाला आहे.