नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना वायरसने अमेरिकले पूर्णपणे झखडले आहे. इथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश हतबल आणि लाचार दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत २ हजार २२८ जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ओढावलेल्या परिस्थितीसाठी WHO ला जबाबदार धरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असलेल्या ट्रम्प यांनी WHO ला दिली जाणारी फंडींग थांबवण्याची घोषणा केली.



WHO ला या गंभीर आजाराची जाणिव होती. पण त्यांनी पूर्ण जगाला या माहितीपासून दूर ठेवले असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.


अमेरिकेनंतर इटली सर्वाधिक कोरोनाबाधित असलेला देश आहे. इटलीत 1 लाक ५९ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे इटलीत २० हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे.


फ्रान्समध्येही कोरोनाचं तांडव सुरुच आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा १५ हजारच्या जवळपास पोहचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत १ लाख ३७ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत २८ हजारहून अधिक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आहे.


कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढत असूनही स्पेनमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १७ हजार ५०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ लाख ७० हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 



भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ९ हजार ३५२ वर गेली आहे. तर भारतात आतापर्यंत ९८० रुग्णबरे झाले आहेत. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ४०० जिल्हे कोरोना प्रभावित आहेत. 


भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोच आहे. मात्र भारतात एक दिलासादायक बाब म्हणजे १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.