Corona News : कोरोनामुळे सारं जग हैराण झालं आहे. लॉकडाऊन काळात कुणाची नोकरी गेली कर कुणाचा उद्योगधंदा बुडाला. पण या मंदीतही संधी शोधणारे कमी नाहीत. फ्रेडी बेकिट नावाच्या तरुणानेही या मंदीत संधी शोधली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय फ्रेडीची दिवसाची कमाई आहे तब्बल 16 हजार रूपये.  तो कुणी मोठा उद्योगपती किंवा पिढीजात श्रीमंतही नाहीये . त्याचं काम आहे रांगेत उभं राहणं. होय. बरोबर ऐकलंत. कोरोनामुळे अनेकांना रांगेत उभं राहण्याची भीती वाटते. तर कित्येक जण रांगेचा कंटाळा करतात. 


अशांच्या मदतीला फ्रेडी धावून जातो. एखाद्या स्टोअरमधली खरेदी असो वा सिनेमाचं तिकीट काढणं असो. अगदी म्युजिअम, मॉल, स्टेडिअम सगळीकडे तो रांग लावतो आणि बदल्यात तासाला 20 ते 160 पाऊंड घेतो. पैशांखातर दिवसभरही रांगेत उभं राहण्याची त्याची तयारी असते. त्याच्या अनोख्या कामामुळे लंडनमध्ये तरूण वर्गात फ्रेडी विशेष लोकप्रिय झाला आहे. 



पैसे कमवायचे झाले तर अक्कल लागते असं आपल्याकडे गंमतीनं म्हंटलं जातं. फ्रेडीच्या बाबतीत ही उक्ती तंतोतंत लागू होते. कोरोनाकाळात तो अडल्या नडल्याच्या मदतीला धावतो आणि बक्कळ पैसा कमावतो. मंदीतही संधी शोधणं जमतं त्याची चांदी होते, हेच खरं.