आपल्याच 6 महिन्यांच्या मुलीसमोर हॉस्पिटलमध्ये या जोडप्यानं का केलं लग्न?
कधीकधी परिस्थिती अशी येते की कोणताच पर्याय उरत नाही...या दाम्पत्यावर अशी काय वेळ आली ज्यामुळे त्यांना आपल्याच 6 महिन्यांच्या बाळासमोर हॉस्पिटलमध्ये लग्न करावं लागलं?
मुंबई: लग्न म्हटलं की तामझाम आला. आतापर्यंत डेस्टिनेशन वेडिंग ते अगदी चर्च किंवा मंदिरात लग्न केलं जातं पण रुग्णालयात चक्क लग्न केल्याचं आतापर्यंत सीरियल आणि सिनेमात पाहिलं असेल. आपल्या चिमुकलीसाठी चक्क एका कपलनं रुग्णालयात लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हा सिनेमाचा सीन नाही तर प्रत्यक्षात हे घडलं आहे.
एका कपलनं आपल्या चिमुकलीला आपल्या लग्नात सहभागी होता यावं आणि तिने हे सुवर्ण क्षण अनुभवावे म्हणून कपलनं रुग्णालयात लग्न केलं. याचे फोटोही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. त्यानंतर हे कपल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं.
ब्रिस्टल इथले राहणाऱ्या करीम आणि लुईसचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी लुईस गर्भवती होती. लुईसने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळी आपल्या लग्नात या चिमुकलीलाही छान तयार करायचं असं स्वप्न तिने रंगवलं. मात्र लुईस आणि करीम यांच्या मुलीला जन्माला येताच गंभीर आजारानं ग्रासलं.
या चिमुकलीला अनुवंशिक गंभीर आजार असल्यानं तिला रुग्णालयातच ठेवणं भाग होतं. चिमुकली आज येईल उद्या येईल असं वाटत असतानाच दिवस उलटले मात्र तिला घरी घेऊन जाणं शक्य नव्हतं. या चिमुकलीसाठी आई-वडिलांनी चक्क रुग्णालय गाठलं आणि तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या चिमुकलीचं नाव लायला असं ठेवलं आहे. या लायलासाठी आई-वडिलांनी रुग्णालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना ब्रिस्टल इथली आहे. लग्नासाठी रुग्णालयात लायलाची रुम सजवण्यात आली होती. तिलाही सुंदर फ्रॉकने तयार करण्यात आलं. आई-वडिलांनी आपल्या 6 महिन्यांच्या चिमुकलीसमोर लग्न केलं.
लायला ही चिमुकली ब्रिस्टल चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. ती एका गंभीर अनुवंशिक आजाराने त्रस्त आहे. लायलाची रूम लग्नासाठी खास फुग्यांनी सजवण्यात आली होती. रुग्णालयातील स्टाफने देखील या कपलला सपोर्ट केला. आपल्या मुलीसाठी या कपलनं चक्क रुग्णालयात विवाह केला. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.