मुंबई : प्रेमी जोडपे हे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि रोमॅन्स करण्यासाठी बहुतेकदा एखाद्या निर्मनुष्य ठिकाणाची निवड करताता, जेणे करुन त्यांच्या एकांताता कोणाचाही व्यत्यय येऊ नये. पण कधी कधी अशा ठिकाणी विचित्र प्रकार घडतो आणि कपलची फजिती होते. या फजितीमुळे त्यांच्यावर आपण इथे का आलो असे म्हणत पश्चाताप करण्याची वेळ बऱ्याचदा ओढवते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना  इंग्लंडच्या डर्बीशायरमध्ये घडली. तेथील स्थानिक पोलिसांनी एका मीडियाला दिलेल्या वक्तव्यानुसार, एक प्रेमी जोडपं रात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी कारमध्ये एकमेकांना भेटले आणि कारमध्येच रोमॅन्स करु लागले. तेव्हा त्यांच्याकडून चुकून कारचा हँडब्रेक सुटला आणि ही कार खाली पडली.


खरेतर छोट्याशा टेकडीच्या उताराव या जोडप्यांनी कार थांबवल्यामुळे कारचा हँडब्रेक निघताच ही कार जोरात खाली आदळली, ज्यामुळे ती कार अशी पडली की, त्यामुळे या जोडप्याला बाहेर निघने देखील अशक्य झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याची यातून सुटका केली आणि त्यांना कार बाहेर काढले.



वाईट रीतीने अडकल्याने पोलिसांचे बचावकार्य


या जोडप्याला वाचवल्यानंतर डर्बीशायर पोलिसांनी या कारचे फोटो ट्विटरवर शेअर केले. फोटोत तुम्ही पाहू शकता की, एक कार तिरपी रस्त्याच्या मध्यभागी पडली आहे. पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, 'डर्बीशायरमधील एका अज्ञात स्थानावर एक जोडपं यारिस कारमध्ये अडकलं होतं आणि ते आपलं नातं अधिक मजबूत करत असताना, वाहन हँडब्रेकवरून निसटले आणि पलटी होऊन एका टेकडीवरून खाली पडले. कोणालाही दुखापत झाली नाही. '


लोकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली


या जोडप्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एका यूजरने लिहिले, 'कृपया सुरक्षित सेक्सचा सराव करा आणि हँडब्रेक काढू नका.' तर दुसऱ्याने लिहिले, 'जो कोणी आपले नाते मजबूत करण्यासाठी आला असेल, त्याला एक अद्भुत अनुभव आला असेल.'