Woman Claims She Died For 40 Seconds:  एका महिलेने 40 सेकंदासाठी मृत्यूचा अनुभव घेतल्याचा दावा केला आहे. या  40 सेकंदात स्वर्गाची सफर केल्याचा दावाही या महिलेने केला आहे.  जिवंत झाल्यावर महिलेने 40 सेकंदाच्या मृत्यू दरम्यान आलेला थरारक अनुभव सांगितला आहे. या महिलेने एका घटनेचा संदर्भ दिला आहे ज्यामुळे सगळेच अचंबित झाले आहे. खरचं मृत्यूनंतरही एक जग आहे आहे? असा प्रश्न या महिलेच्या दाव्यामुळे उपस्थित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यू जर्सी येथील एका 32 वर्षीय महिलेने आपला 40 सेकंदासाठी मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. कोर्टनी सँटियागो (Courtney Santiago) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला स्तनाचा कर्करोग झाला आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. यामुळे तिला नेहमी रुटीन स्कॅनसाठी जावे लागते. या रुटीन स्कॅन 40 सेकंदासाठी आपला मृत्यू झाल्याचा दावा या महिलेने केला आहे. मिररने या बाबतचे वृत्त दिले आहे.


काय आहे महिलेचा अनुभव


जुलै 2022 मध्ये कोर्टनी नियमित स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात गेली होती. तेव्हा तिचा रक्तदाब कमी झाला. ती बेशुद्ध अवस्थेत गेली होती. यावेळी एक असा क्षण होता जेव्हा  ना स्वतःची चिंता होती ना कुटुंबाची असे कोर्टनीने सांगितले. आपण समुद्रकिनारी उभे आहोत. त्याचवेळी समोर एक अशी व्यक्ती दिसली ज्या व्यक्तीला मी कधीच पाहिले नव्हते किंवाच भेटली नव्हती. पण, या व्यक्तीशी ओळख असल्यासारखे वाटले. त्याचवेळी या व्यक्तीने माझ्याशी संवाद साधला.  अजून तिथून जाण्याची वेळ आलेली नाही असे या व्यक्तीने सांगितल्याचा दावा  कोर्टनी हिने केला आहे.


परत जिवंत झाले


40 सेकंदासाठी हे सर्व मी अनुभवले. माझा मृत्यू झाला होता. मी पुन्हा जिवंत झाले. माझ्यात प्राण आले. प्रत्यक्षात मात्र, माझ्या तोंडातुन शब्द फुटत नव्हते. माझ्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. मात्र, 40 सेकंदात मी वेगळ्याच दुनियेत भ्रमण करुन आहे. या 40 संकेदात मी जे पाहिले त्याचे वर्णन कथित स्वर्गासोबत केले जाऊ शकते असे ही  कोर्टनी म्हणाली.


डॉक्टरांनी महिलेचा दावा खोडून काढला


डॉक्टरांनी  मात्र, महिलेचा दावा खोडून काढला आहे. हे शक्या नाही. अशा प्रकारे मृत्यू झालेल व्यक्ती पुन्हा जिवंत होत नाही. मेंदुला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने ही महिला बेशुद्ध झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.