पॅरिस : भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. (Coronavirus in India) त्यामुळे येथे कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. भारतातील कोरोनाव्हायरसची दुसरी लाट बघता बिघडलेल्या परिस्थितीमुळे जगातील अनेक देशांचा ताण वाढला आहे. आता फ्रान्सने (France) खबरदारीचा पाऊल म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी 10 दिवस क्वारंटाईन (Quarantine) होणे अनिवार्य केले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारताचा प्रवास टाळण्याचे सल्ला दिला आहे. अमेरिकेने (America) असे म्हटले आहे की, ज्या लोकांनी कोरोना लस घेतली आहे. (Corona Vaccine) त्यांनी देखील सध्याच्या वातावरणात भारतात जाणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे धोका लक्षात घेता ब्रिटनने देखील  (UK) भारताला 'रेड लिस्ट' मध्ये समाविष्ट केले आहे.


Travel Ban बाबत लवकरच निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सने यापूर्वी ब्राझीलहून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यासह, सरकारने असे म्हटले आहे की, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांनाही क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूबाबत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने सांगितले आहे, जिथे परिस्थिती अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे, तेथे आम्ही त्या देशांची कोरोना स्थिती लक्षा घेऊन कठोर निर्णय घेऊ. आगामी काळात प्रवासबंदीबाबतही  (Travel Ban) निर्णय घेण्यात येईल.



दोन्ही देशांमध्ये  Air Bubble Agreement  


भारत आणि फ्रान्स दरम्यान एअर बबल करार (Air Bubble Agreement) आहे. त्याअंतर्गत एअर इंडिया आणि एअर फ्रान्स या दोन देशांदरम्यान उड्डाणे चालवित आहेत. एअर फ्रान्सकडून आठवड्यातून 10 उड्डाणे चालविली जातात, ती पॅरिसहून दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुला येतात. फ्रान्स सरकारच्या या निर्णयानंतर तेथे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट होईल, असा विश्वास आहे.  भारतातील कोरोनाचा वेग सतत वाढत आहे. दररोज आणखी नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. हे लक्षात घेऊन लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरु होणार आहे. यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. 


Air Indiaने अनेक उड्डाणे केली रद्द 


तसेच एअर इंडियाने 24 ते 30 एप्रिल दरम्यान यूकेकडे जाणारी बहुतेक उड्डाणे रद्द केली आहेत. ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये टाकल्यानंतर विमान उड्डाणांची संख्या मर्यादित ठेवण्यात आल्याचे एअरलाइन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे.  24 ते 30  एप्रिल या कालावधीत 13 साप्ताहिक उड्डाणे करण्याऐवजी मुंबई आणि दिल्लीहून लंडनला फक्त एकच उड्डाण होईल. एअर इंडियाने असे सांगितले आहे की, ज्यांनी आधीच तिकिट बुक केले आहेत, त्यांना लवकरच पैसे परत केले जातील. लवकरच याबात सूचित केले जाईल.