Corona फक्त 3 दिवसात 11 लाख रुग्ण वाढल्याने या देशात खळबळ, भारताला किती धोका?
Covid 19 cases : जगभरातील लोकांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढलं आहे. कारण कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. काही देशांमध्ये याचा कहर सुरु झाला आहे.
Covid 19 cases : कोरोना व्हायरसने (covid 19 virus) पुन्हा एकदा कहर करायला सुरुवात केली आहे. आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविड-19 च्या नवीन प्रकरणांमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. एकट्या दक्षिण कोरियामध्ये (South Korea) तीन दिवसांत 11 लाख नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर चीनमधील परिस्थितीही अनियंत्रित होत आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराने युरोपातील काही देशांमध्येही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच कोरोनाचा धोका (Corona Risk) सातत्याने वाढत आहे. भारतात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने घट होत आहे. मात्र आशियाई देशांमध्ये वाढत्या धोक्यानंतर केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क आहेत.
गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाचे 11 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर या काळात 2917 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील सर्वाधिक प्रभावित देशाबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण कोरियामध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.
दक्षिण कोरियामध्ये (South Korea) गेल्या 24 तासांत 3.34 लाख रुग्ण आढळले आहेत. तर तीन दिवसांत हा आकडा 11 लाखांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती पुन्हा एकदा अनियंत्रित होऊ लागली आहे. अनेक शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता, तरीही नवीन प्रकरणांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. (Lockdown In china)
मृतांची संख्या वाढली
20 मार्च रोजी दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे 3,34,708 रुग्ण आढळले होते. 19 मार्च रोजी 3,81,329 आणि 18 मार्च रोजी 4,07,017 प्रकरणे आढळून आली होती. गेल्या तीन दिवसांत येथे 900 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
चीनमध्ये 4 हजारांहून अधिक नवीन रुग्ण
चीनला कोरोनाचा दोन वर्षांतील सर्वात भीषण हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. जिलिन प्रांतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर जिलिन येथे रविवारी निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. सोमवारपासून 45 लाख लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. रविवारी चीनमध्ये 4,000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले. यापैकी दोन तृतीयांश प्रकरणे जिलिन प्रांतात आढळून आली.
भारताला किती धोका ?
जगभरात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत असली तरी, भारतातील (corona situation in India) तज्ज्ञांचे मत आहे की, भारतातील भविष्यातील कोरोना लाटेचा (Corona forth wave) फारसा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतातील जलद लसीकरण आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती यामुळे कोविड-19 च्या लाटांचा आगामी काळात गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही.
भारतात सोमवारी कोरोनाचे 1,549 रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 25,106 सक्रिय प्रकरणे आहेत. (Corona cases in india in last 24 hours)