नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात असली तरी देखील शेजारील देशांमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जातांना दिसत आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे भारत देखील आता सतर्क झाला आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी एक महत्त्वाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Indian Government alert after covid cases incraese in world)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये कोरोनाची स्थिती (China Corona cases) ही आता बिघडत चालली आहे. फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वात वाईट परिस्थिती सध्या चीनवर ओढावली आहे. दिवसाला 3 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. फक्त चीनच नाही तर हाँगकाँग, दक्षिण कोरिया, आफ्रिका आणि यूरोपीयन देशांमध्ये देखील कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे.


भारतात कोरोनाची तिसरी लाट कमजोर पडली. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली. पण आता चीन आणि इतर देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (New verient) पुन्हा एकदा संसर्ग वाढवला आहे. आरोग्य मंत्र्यांनी रुग्णांच्या संख्येवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


भारतात 2 वर्षाच्या निर्बंधानंतर 17 मार्चपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता चिंता वाढल्या आहेत. याच कारणामुळे आरोग्य मंत्र्यांनी बाहेरुन देशात येणाऱ्या लोकांची टेस्टिंग वाढवण्य़ाच्या सूचना ही दिल्या आहेत.


चीनमध्ये ओमायक्रॉनचा सब-वेरिएंट BA.2 सध्या थैमान घालत आहे. काही देशांमध्ये Deltacron ची प्रकरणं ही पुढे आली आहेत. डेल्टाक्रॉन कोरोनाच्या डेल्टा (Delta) आणि ओमायक्रॉन (Omicron) वेरिएंट पासून बनलेला वेरिएंट आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) माहितीनुसार, गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 2,539 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. 4,491 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 30,799 रुग्णावर उपचार सुरु आहेत.


जानेवारीच्या शेवटी जगात रुग्ण संख्या कमी होऊ लागली होती. पण आता कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. WHO च्या माहितीनुसार गेल्या एका आठवड्यात 1.10 कोटी रुग्ण वाढले आहेत.


WHO ने बुधवार चीन आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे रुग्ण 25% टक्क्यांनी तर मृतांचा आकडा 27% टक्क्यांनी वाढला असल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झरलँड, नेदरलँड आणि यूके मध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. यूरोपात नव्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेत देखील आकडा वाढण्याची शक्यता आहे.