बीजिंग : Covid19 in China : जगभरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढत आहे. आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे चीनने शाळा बंद केल्या आहेत, प्रवासावर निर्बंध लावले आहेत आणि फुजियान प्रांतात लाखो लोकांना चाचण्या करण्याचा आदेश दिले आहेत. कारण याठिकाणी पुन्हा कोविड-19 मोठ्या प्रमाणावर संक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. हे संक्रमण दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. (Covid19 infections :China has shut down schools, put in place travel restrictions)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुजियान प्रांतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. शाळेतील मुलांना कोरोनाचा धोका पोहोचला आहे. जवळपास 36 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येथील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुलांना कोविडचे संक्रमण अचानक वाढीमुळे संसर्ग झाला आहे. शाळेत करण्यात आलेल्या कोविड चाचणी दरम्यान ही बाब उघड झाली आहे.


मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे चीनने शाळा बंद केल्या आहेत. प्रवासावर निर्बंध लावले आहेत आणि फुजियान प्रांतात लाखो लोकांसाठी कोरोनाची चाचणी करण्यात सांगितले आहे. कारण येथे नवीन कोविड -19 संसर्गाचा केस मंगळवारी संध्याकाळपर्यंत दुप्पट झाल्याच्या दिसून आले.  


ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची सुमारे 20 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिन्हुआ वृत्तसंस्थेने एका अहवालात म्हटले आहे की, महाविद्यालये, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक शाळांना त्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन घ्यावे असे सांगण्यात आले आहे. तसेच शिशुवर्गाचे वर्ग घेऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


चीनच्या (China) आग्नेय प्रांतात फुजियानमध्ये (Fujian) पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. इथं कोरोनाची प्रकरणे अचानक दुप्पट झाली आहेत. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लोकांना सिनेमा हॉल, सार्वजनिक वाहतूक यासह सर्व सार्वजनिक उपक्रम बंद करून शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झियामेन, एक बंदर, शहर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे येथील नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी याची घोषणा केली. तसेच प्रवासावर निर्बंधही घालण्यात आले आहेत. आतापर्यंत पुतियन, क्वानझोऊ आणि प्रांतीय राजधानी झियामेन या तीन शहरांमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. संक्रमित लोकांचे संपर्क शेजारच्या प्रांतात गेले आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे.