World Crime News : एखाद्या सराईत गुन्हेगाराला मागे टाकेल असे धक्कादायक कृत्य अमेरिकेत एका महिलेने केले आहे. या महिलेने आपल्या पाचव्या नवऱ्याला विष पासून तिची हत्या केली आहे. तसेच तिने तिच्या बॉयफ्रेंडलाही गोळ्या घातल्या आहेत. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने हे कृत्य का केले यामागचे धक्कादायक कारण तपासात समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. साराह हर्ट्सफील्ड  असे या महिलेचे नाव आहे. ही महिला यूएस आर्मीमध्ये कार्यरत होती.  पतीची हत्या केल्याचा आरोप या महिलेवर आहे. साराहने पाचव्या पतीला इन्सुलिनने विष देऊन तिची हत्या केली आहे. हार्ट्सफिल्डचा 46 वर्षीय पती मधुमेहाचा रुग्ण होता. तिने औषधातून नवऱ्याला विष दिले. त्यानंतर तब्बल 6 तासांनी प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. यानंतर काही वेळातच तिच्या पतीचा मृत्यू झाला.


पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये देखील तिच्यावर अशाच प्रकारचे आरोप झाले होते.  हार्ट्सफिल्डवर  तिचा प्रियकर  डेव्हिड ब्रॅगचा छळ करणे आणि नंतर त्याला गोळ्या घालणे यासारखे गंभीर झाले होते. मत्र, प्रियकरच हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे तिने कोर्टाला सांगितले होते. यामुळे या प्रकरणात तिला मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर आता पाचव्या पतीची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर झाला आहे. 


या दोन प्रकरणांसह  हार्ट्सफिल्डवर इतरही अनेक गंभीर आरोप आहेत.  मार्च 1996 मध्ये, हार्ट्सफील्डने तिचा दुसरा पती, मायकेल ट्रॅक्सलर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात तिला अटक देखील झाली होती. आठवडाभर  हार्ट्सफील्ड तुरुंगात राहिली होती. यानंतर पतीने केस मागे घेतल्यावर ती जेलमधून बाहेर आली. 


हार्ट्सफील्डने जवळपास पाच जणांशी विवाह केला होता. तसेच तिचे अनेक बॉयफ्रेंड आहेत. अनेक पुरुषांशी संबध असल्याने तिचे आणि तिच्या मुलाचे नेहमीच वाद होतात. हार्ट्सफील्ड अनेक पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढळते. आपल्या जाळ्यात अडकेलेल्या पुरुषांकडून पैसे उकळण्याचा तिचा धंदा आहे. अनेक पुरुषांना तिने लुटल्याचा आरोप केला जात आहे.


पाचव्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर तिचा सर्व कारनामा उघड झाला आहे. महिलेने पाचव्या पतीची हत्या केली. दुसऱ्या पतीवर हल्ला केला. तर तिचे दोन नवरे तिला सोडून गेले आहेत. तिने तिच्या एका बॉयफ्रेंडला देखील संपवण्याचा प्रयत्न केला आहे.