सैतान पुजणाऱ्या नराधमानं पत्नीचा खाल्ला मेंदू; हादरवणाऱ्या घटनेमुळं पोलिसांच्याही अंगावर काटा
Shocking News : पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे केले आणि अवशेष प्लास्टिकच्या पिशवीत भरले. मारेकऱ्याने शरीराचे काही भाग फेकून दिले आणि बाकीचे घरी ठेवले होते.
Crime News : मेक्सिकोतून (Mexico) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. मेक्सिकोत एका पतीला पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पतीने त्याच्या पत्नीची हत्या केल्या नंतर त्याच घरात राहत होता अशीही माहिती समोर आली आहे. आरोपी पतीने पत्नीच्या हत्येनंतर तिचा मेंदू बाहेर काढून खाल्ल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी अल्वारो या 32 वर्षीय मेक्सिकन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात 29 जून रोजी त्याने आपल्या पत्नीची गुंगीचे औषध देऊन हत्या केली होती. हत्येनंतर त्याने मृतदेहासोबत जे केले ते अंगावर काटा आणणारे होते.
आरोपी पतीचे नाव अल्वारो असे आहे तर पीडित पत्नीचे नाव मारिया मोन्सेरात असल्याचे सांगण्यात येत आहे. 32 वर्षीय अल्वारोवर 29 जून रोजी ड्रग्जच्या प्रभावाखाली पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. पीडित महिला पाच मुलांची आई होती. 2 जुलै रोजी पुएब्ला येथील घरातून त्याला पकडण्यात आले होते. चौकशीदरम्यान अल्वारोने अधिकाऱ्यांना सांगितले की तो सांता मुएर्टे (लेडी ऑफ होली डेथ) आणि सैतानाने त्याला हत्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच त्याने पत्नीला मारण्याचा कट रचला. अल्वारोने मारियाची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर त्याने ते तुकडे पॉलिथिनच्या पिशवीत टाकले आणि काही भाग घरामागील खड्ड्यात फेकून दिला. इतकं की त्याने त्याच्या घरामध्ये मृतदेहाचे काही तुकडे ठेवले होते.
आरोपी अल्वारो हा सैतानाची पूजा करत होता. त्याला 'कॅनिबल ऑफ पुएब्ला' असेही म्हणतात. अल्वारोने मारियाची हत्या केल्यानंतर तिचां मेंदू खाल्ला आणि तिची कवटी अॅशट्रे म्हणून वापरली. आरोपीला मेक्सिको पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. सांता मुएर्टे हे मृत्यूचे अवतार असल्याचे म्हटले जाते आणि मेक्सिको आणि अमेरिकेत त्याची पूजा केली जाते. कॅथलिक धर्मातल्या इतर संतांप्रमाणे, सांता मुएर्टे यांना मृत्यूची देवी म्हणून संबोधले जाते.
हत्येनंतर दोन दिवसांनी त्याने आपल्या सावत्र मुलीला बोलवून गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने हा सगळा प्रकार तिची आजी मारिया अॅलिसिया सांगितले. अॅलिसियाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मारिया अॅलिसियाने असेही सांगितले की अल्वारोने तिच्या 38 वर्षांच्या मुलीला चाकू, छिन्नी आणि हातोड्याने मारले. मारिया मॉन्सेरात हिचे अल्वारोसोबत एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याला 12 ते २३ वयोगटातील पाच मुली होत्या. धाकट्या दोन मुली या दोघांसोबत राहत होत्या. आरोपीहा मुली जेव्हा आंघोळ करत असत तेव्हा तो त्यांना गुपचूप पाहत असे.