लंडन : भारतीय बँकांना फसवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याविरोधात भारतीयांमध्ये आणि परदेशस्थ भारतीयांमध्येही किती संताप आहे याचं प्रत्यंतर भारत ऑस्ट्रेलिया सामन्याआधी आलं. मल्ल्या मैदानात आल्यावर भारतीय प्रेक्षकांनी चोर चोरच्या घोषणा सुरू केल्या. देखो देखो कौन आया... चोर आया चोर आया... अशा घोषणा मल्ल्याला वेढलेल्या भारतीय प्रेक्षकांनी सुरू केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची माफी माग, कारवाईला सामोरा जा, भारतीय बँकांचे पैसे परत कर अशा घोषणा प्रेक्षकांमधून येत होत्या. मल्ल्यासोबत असलेला त्याचा साथीदार मात्र चोर नाही, चोर नाही असं सांगण्याचा प्रयत्न करत होता. अखेर मल्ल्याला लंडन पोलिसांच्या गराड्यातून तिथून बाहेर काढण्यात आलं.


आपण मॅच पाहण्यासाठी आलो असल्याचे मीडियाला उत्तर देऊन माल्ल्याने तेथून स्टेडियममध्ये पळ काढला. भारतीय बॅकांचं ९ हजार कोटींचं कर्ज न फेडता माल्ला इंग्लंडला पळून गेला आहे.


उद्योगपती विजय मल्ल्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. विजय मल्ल्या लंडनमध्ये मौजमजा करत असल्याचंच यावरुन दिसून आलं. दरम्यान भारत आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावरुन वाटाघाटी सुरु आहेत.