ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र
ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
Viral News : फूड डिलिव्हरी अॅप्समुळे (food delivery app) घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध होऊ लागलं आहे. भारतात सध्या हजारो लोक नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर (Online Food Order) करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण अनेक वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला (Customer) आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर (Social Media) शेअरही केलाय.
एका ग्राहकाने ऑनलाईन चिकन विंग्सची ऑर्डर केली. काही वेळाने डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) त्याला ऑर्डर आणूनही दिली. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या ग्राहकाने पॅकेट उघडून बघितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. जेवणाच्या पाकिटात चिकन विंग्सऐवजी चक्क चघळलेली हाडं होती. कुणीतरी चिकन खाऊन केवळ हाडं ठेवली होती. या पाकिटात त्याला एक पत्रही मिळालं.
काय होतं त्या पत्रात
ग्राहकाने ते पत्र उघडून पाहिलं असता त्या पत्रात माफीनामा होता. हे पत्र डिलिव्हरी बॉयने लिहिलं होतं. त्याने या पत्रात लिहिलं होतं, 'मी खूप भूकेला होतो, आणि त्रस्त होतो', ग्राहकाने या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला.
@thesuedeshow नावाच्या एका युजरने चघळलेल्या हाडांचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिलंय, मी मागवलेलं चिकन विंग्स डिलिव्हरी बॉयने खाल्ले. मी हे सहन करू शकत नाही. मी चिकन विंग्सची ऑर्डर दिली होती आणि मला पॅकेटमध्ये फक्त हाडे मिळत आहेत. तुमच्या लक्षात आले की माझे फ्राईज देखील गायब आहेत . त्याचं कोल्ड्रींक मात्र त्याच्यापर्यंत सुखरूप पोहोचलं होतं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत जवळपास 2 लाख 30 हजार वेळा पाहिला गेलाय. डिलिव्हरी बॉयने त्याचं जेवण का खाल्लं याचं कारणही सांगितलं. मला खूप भूक लागली होती, असं समजा की माझ्या जेवणाचे पैसे तुम्ही भरलते. मी हा जॉब सोडत आहे, पत्रात त्याने शेवटी लिहिलं होतं, Your Door Dash Guy.
या व्हिडिओत ग्राहकाने पुढे लिहिलंय, आता काय करावं हे मला सुचत नाहीए? मी पुन्हा जेवणाची ऑर्डर करत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने म्हटलंय कस्टमर केअरला फोन करा, म्हणजे तुम्हाला रिफंड मिळेल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, त्या डिलिव्हरी बॉयचं कृत्य चुकीचं होतं.