लंडन : प्रत्येक जण कधीतरी हॉटेलमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जात आसतात. जेवण झाल्यानंतर वेळ येते ती बील भरण्याची. बील भरल्यानंतर आपण वेटरला टीप स्वरूपात स्वइच्छेने काही पैसे देतो. पण एका ग्राहकाने महिला वेटरच्या सौंदर्यावर घायाळ होत भरघोस टीप देत खास पोस्ट लिहिली आहे. त्या ग्राहकाने महिलेला 750 युरो म्हणजे जवळपास 65 हजार 117 रूपये टीप म्हणून दिले आणि त्यावर एक टीप लिहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिररच्या रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाची नोट पाहून संपूर्ण स्टाफला मोठा धक्का बसला. ग्राहकाना महिला वेटरला टीप म्हणून आलेल्या बीलापेक्षा सुमारे 8 पट जास्त पैसे दिले. महिला वेटरने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकाचं एकून बील 93.456 युनो म्हणजे जवळपास 8 हजार 110 रूपये झालं होत. पण ग्राहकाने बीलसोबत 750 युरो म्हणजे जवळपास 65 हजार 117 रूपये टीप म्हणून दिले. 


ग्राहकाने नोटमध्ये काय लिहिलं?
ग्राहकाने नोटमध्ये महिला वेटरच्या सौंदर्याचं वर्णन केलं. 'तुम्ही फार सुंदर दिसता. मला कॉल करा..' एवढंच नाही तर ग्राहकाने बीलवर स्वतःचा मोबाईल नंबर देखील लिहिला. ग्राहकाचा असा मेसेज वाचून महिला घाबरली. महिला वेटरने सोशल मीडियावर नोटचा फोटो देखील शेअर केला.