Cyclone Biparjoy Update : अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रिवादळानं महाराष्ट्रात फारसं नुकसान केलं नसलं तरीही गुरजरात आणि तिथून थेट (Pakistan News) पाकिस्तानच्या कराचीमध्ये (Karachi) मात्र या चक्रिवादळाचे परिणाम दिसून येत आहेत. वृत्तवाहिन्या आणि अनेक माध्यम समुहामुळं सध्या वादळाच्या तीव्रतेची कल्पना आणि ते नेमकं कुठवर पोहोचलं आहे याचीही कल्पना मिळत आहे. याच बातम्यांच्या गर्दीत एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांनाच 'चांद नवाब' आठवतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बजरंगी भाईजान' या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीननं साकारलेला चांद नवाब जेव्हा प्रत्यक्षात सर्वांसमोर आला तेव्हा एकच हशा पिकला. बातमी देताना अनेक मंडळींच्या बोलीभाषेत स्थानिक बाज पाहायला मिळतो. इथं चांद नवाब यांच्याही रिपोर्टिंगमध्ये तोच अंदाज पाहायला मिळाला आणि नकळतच त्यांच्या शैलीनं सर्वांना खळखळून हसण्याची संधी दिली. 


हेसुद्धा वाचा : Cyclone Biparjoy मुळं या किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता


आता पुन्हा एकदा पाकिस्तानातूनच एका रिपोर्टरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो बातमी देण्यासाठी आणि वादळाचे परिणाम दाखवून देण्यासाठी चक्क पाण्याच्या प्रवाहात उडी मारताना दिसत आहे. वार्तांकनाच्या त्याच्या या अंदाजानं अनेकांनाच नेमकं 'म्हणावं तरी काय?' हा प्रश्न पडला आहे. 


तुम्ही पाहिला का हा व्हायरल व्हिडीओ? 


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बातमी देणारा रिपोर्टर आपलं नाव अब्दुर रहमान असल्याचं सांगत आहे. बातमीची सुरुवात करण्यापासून ते अगदी 'पाहा पाण्याची पातळी किती वाढलीये, पाहा लाटा कशा आहेत...' वगैरे वगैरे तो बरंच काही सांगताना दिसत आहे. बरं इतक्यावरच न थांबता तो पाण्याची खोली दाखवण्यासाठी काही कळण्याच्या आतच समुद्रा उडी मारताना दिसतोय. 



पाण्यात उडी मारल्यानंतर हा अब्दुर तिथूनही रिपोर्टींग करतोय हे पाहताना आता त्याच्या कामाप्रती असणाऱ्या तत्परतेला दाद द्यावी की त्याच्या या कृतीवर हसावं हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.